💥महावितरणचे उपविभागीय अभियंता भागवत यांच्याकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन दिला इशारा💥
गंगाखेड- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महावितरण कंपनीतील 50% याच्यावर पदे रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने ही पदे तात्काळ न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा धनगर साम्राज्य संघटनेचेच संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता भागवत यांच्याकडे गुरूवारी दिलेलया लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महावितरणच्या उपविभागातील 50% वर पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक बिघाड झाल्यास तो सुधारण्यासाठी बराच वेळ लागतो. पिकाला पाणी देण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. गावात विज असूनही तात्पुरता बिघाड झाल्यामुळे उपकरणे वापरता येत नाहीत. महातपुरी येथील दवाखान्याच्या परिसरात असलेला डीपी सतत नादुरुस्त होत असतो. तो उघड्यावर असल्याने येथे लहान बालके जाऊन जीवितास धोका होण्याची शक्यता आहे. हा डीपी दुरुस्त करावा व तो सुरक्षित झाकून ठेवावा .त्याचबरोबर पडेगाव येथील पदेही रिक्त असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. एकूणच गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील पदे तात्काळ भरावीत नसता आंदोलन करण्यात येईल असा इशारा धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी महावितरण उपअभियंता भागवत यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर, साई सेवा प्रतिष्ठानचे गोविंदराव यादव, महातपुरी येथील भाजपाचे कार्यकर्ते मुस्तफा भाई, ग्रामपंचायत सदस्य दिनू टेलर घिसडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत...
0 टिप्पण्या