💥हत्येनंतर अद्यात दरोडेखोरांनी दुकानातील सोन्या चांदीचे दागिनेही पळवले💥
नांदेड/शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारा परिसरात सराफा व्यापाऱ्यावर कैचीने हल्ला करून निघृण हत्या केल्याची भयावह घटना घडली असून व्यापाऱ्याच्या हत्येनंतर अज्ञात दरोडेखोरांनी दुकानातील सोन्या-चांदीचा मालही पळवला असल्याचे समजते या घटने मुळे संपूर्ण सराफा व्यापारपेठेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की सराफा बाजारातील गुरुकृपा ज्वेलर्स या दुकानात घुसून अद्यात दरोडेखोरांनी हल्ला करून प्रचंड दहशत माजवत. व्यापारी रवींद्र चक्रवार यांच्यावर कैचीने हल्ला करत त्यांची निघृण हत्या करण्यात केली हत्येनंतर अद्यात दरोडेखोरांनी दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटून पोबारा केला.यावेळी घटनेचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हल्लेखोर चोरट्यानी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचे कृत्यही केले या घटनेमुळे सराफा बाजार परिसरातील व्यापाऱ्यांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सराफा बाजारात काल शुक्रवार दि.२५ आक्टोंबर २०१९ रोजी रात्री ०९-०० वाजेच्या सुमारास हत्या आणि लुटीची ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी शहरात जोरदार पावसाला सुरूवात झाली होती नेमके याच वेळे दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी हे भयावह कृत्य केले आहे.विशेष बाब म्हणजे सदरील दुर्दैवी घटना घडल्यानंतर ही बराच काळ कुणालाच घटने संदर्भात काही समजले नसल्याचे समजते.वडीलांना घरी यायला नेहमीपेक्षा जास्त उशीर झाल्याने त्यांच्या मुलाने मोबाईल वर फोन करून पाहिले पण रवींद्र चक्रवार यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे मुलाने दुकान गाठले तर चक्रवार हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटना उघडकीस यायला बराच वेळ लागला, यातच रवींद्र चक्रवार यांचा जीव गेला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान मारेकरी फरार झाले आहेत. हत्या आणि लुटीच्या या घटनेमुळे नांदेडमध्ये व्यापारी वर्गात दहशत पसरलीय. नांदेडमध्ये गुन्हेगारांचे साम्राज्य निर्माण झाले की काय अशी परिस्थिती गेल्या काही दिवसातील घटनांमुळे निर्माण झाली आहे...
0 टिप्पण्या