💥आगामी काळात धनगर आरक्षणाचासी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कदम म्हणाले💥
पूर्णा/प्रतिनिधी-गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांतील मुलभूत प्रश्न, प्रलंबीत असून अनेक गावात रस्त्यांचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे हे प्रश्न सोडवण्याची ताकद शिवसेना भाजप महायुती सरकार मध्ये असून मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन महायुतीचे अधीकृत उमेदवार विशाल यांनी केले.
विशाल कदम यांनी बुधवारी ९ रोजी पुर्णा-पालम तालुक्यातील पालम,फळा,राणीसावरगांव चुडावा,गौर भाटेगांव, धनगरटाकळी ,आव्हई आदीं गावांत त्यांनी भेटी दिल्या यावेळी बोलताना शिवसेना भाजप महायुती नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे.तसेच निराधारांचे प्रश्न सोडविले असून निराधारांच्या मानधनात वाढ केली आहे.तसेच मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवला आहे.आगामी काळात धनगर आरक्षणाचासी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असे त्यांनी सांगितले.यावेळी सभापती बालाजी देसाई,उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, हिराजी भोसले, विश्वनाथ सोळंके,प्रकाशराव क-हाळे, काशिनाथ काळबांडे, हनुमंतराव पौळ, अनिल सातपुते, गजानन पवार, श्याम कदम, नितीन बंटी कदम,मुंजा कदम, नवनाथ लोखंडे,राजेश भालेराव,दशरथ बोबडे, पिंटू काळे आदींची उपस्थिती होती..
0 टिप्पण्या