💥परभणीत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्तें ? जनसामान्यांना पडला प्रश्न..!


💥महानगर पालीका प्रशासनाचे रस्त्यांरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष💥             

परभणी : शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ - मोठे खड्डे पडले आहेत . याकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत अशी तक्रार मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे शहरात पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मोहीम मनपाने हाती घेतली होती  अनेक रस्त्यावर मुरूम ही टाकला परंतु टाकलेला मुरूम पावसाळ्यातील पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे यामुळे अनेक वाहन.चालकांना मणक्याचे आजार झाले तर.छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे याकडे महानगरपालिकांनी लक्ष देऊन खड्डे बुजून नागरिकांना होणारा त्रास दूर करून सुविधा द्यावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर वतीने करण्यात आली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या