💥प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ उप गुप्त महाथेरो यांची राहणार प्रमुख उपस्थिती💥
परभणी, दि. १३ - डॉ आंबेडकर चौक पूर्णा येथे १५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याचे, व सत्कार कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ उप गुप्त महा थे रो पूर्णा हे असून, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कांबळे हे आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा संयोजक माजी उप नगराध्यक्ष , नगरसेवक उत्तम भैया खंदारे हे आहेत. प्रमुख वक्ते, सत्कारमूर्ती म्हणून अड विवेकभाई चव्हाण अध्यक्ष भारतीय दलीत कोब्रा संघटना पुणे, अजिम नवाज राही सुप्रसिद्ध कवी लेखक बुलढाणा , हे असून पो नि प्रविण मोरे स्थानिक गुन्हे शाखा परभणी , महापौर अनिता रविंद्र सोन कांबळे परभणी, भुजंगराव कांबळे , जगदिश जोगदंड शहाजी खंदारे यांचा विशेष सत्कार होणार आहे. यावेळी प्राचार्य मोहन मोरे , सीताराम अप्पा एकलारे , राजू खरात , राजकुमार एंगडे, जमाल पहेलवान , पो नी सुभाष राठोड , गौतम मोगले नगरसेवक अड धम्मा जोंधळे , नगरसेवक अड हर्ष वर्धन गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन त थागत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या