💥मुंबईत आज १६ जानेवारी रोजी अध्यक्ष मनहास यांनी आयोजीत केलेली बैठक उपसचिवांनी केली रद्द💥
नांदेड/येथील गुरुद्वारा सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्डाचे पुर्व भाजपा सरकार द्वारा शासन नियुक्त अध्यक्ष भुपिंदरसिंघ मनहास यांच्या मनमानी कारभारा विरोधात जनमतातून निवडून आलेले सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य तथा हुजूरी क्रांती संघटनेचे प्रधान स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले यांनी दंड थोपटले असून पुर्व भाजपा सरकार द्वारा नियुक्त अध्यक्ष मनहास यांनी नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाची महत्वपूर्ण बैठक नांदेड ऐवजी बेकायदेशीरपणे आज गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित केली होती सदरील आयोजित बेकायदेशीर बैठकीस तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी सदस्य मनप्रीतसिंघ कुंजीवाले यांनी एका रितसर तक्रार अर्जाद्वारे दि.१० जानेवरी २०२० रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता
या संदर्भात एक प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवण्यात आली होती या अर्जाची तात्काळ दखल घेत शासनाचे उपसचिव रविराज फल्ले यांनी आज १६ जानेवारी रोजी मुंबई येथे आयोजित बैठकीस स्थगिती दिल्याची घोषणा करीत तसे लेखी पत्र क्र.जीयुआर-२०२०/प्र.क्र.१२/ज-७ अ महसुल व वन विभाग,मंत्रालय मुंबई दि.१५ जानेवारी २०२० रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठलवे आहे.
नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्ष पदावर जनमतातून निवडून येणाऱ्या सदस्याची निवड करण्यात यावी अशी मागणी मागील अनेक वर्षापासून सिख समाजातून होत असतांना स्थानिक सिख समाजाच्या भावनांचा अनादर करीत यापुर्वीच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारणे सिख समाजाची सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या हस्तक्षेप करीत बोर्डाच्या अध्यक्ष पदावर भुपिंदरसिंघ मनहास यांची नियुक्ती केली होती त्यामुळे स्थानिक सिख समाजात प्रचंड रोष निर्माण झालेला असून शासन नियुक्त अध्यक्ष मनहास यांच्या मनमानी कारभारा विरोधात जनमतातून निवडून आलेले बोर्डाचे सदस्य तथा हुजुरी क्रांती संघटनेचे प्रधान स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले सातत्याने प्रखर लढा देत असून त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जा नंतरच आज मुंबई येथे आयोजित नांदेड गुरुद्वारा बोर्डाची बैठक रद्द केल्याने त्यांच्या या यशस्वी लढ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे..
0 टिप्पण्या