💥पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात स्नेहसम्मेलन संपन्न...!



💥समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते कैलास वाघमारे यांची उपस्थिती💥 

पुर्णा- येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात स्नेह सम्मेलन समारोह संपन्न  झाला. समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते कैलास वाघमारे यांची उपस्थिती होती.
श्री गुरू बुद्धिस्वामी  शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सितारामआप्पा एकलारे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर सचिव प्रा. गोविंदरावजी  कदम, सहसचिव श्री.अमृतरावजी कदम, कोषाध्यक्ष श्री.उत्तमरावजी कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते  यावेळी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे 'तानाजी ' चित्रपटात चुलत्या ची भुमिका करणारे कैलास वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या ध्येयाच वेड लागले पाहिजे माझ्याकडे कोणतीही पाश्र्वभूमी नसताना चित्रपटात जाण्याचे वेड मला होते, मी महाविद्यालयीन जीवनापासूनच अशा स्नेह संमेलनात नाटक करायचो, याठिकाणी मिळालेले पारितोषिक मला खुप मोठ बळ द्यायचे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी केले तर सूत्र संचलन डाॅ.व्यंकट कदम यांनी तर आभार  प्रा. शिवदास थगणर यांनी मानले.  प्रा.बसू कानडे व डॉ. भुताळे पांडुरंग यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.अदिनांथ इंगोले ,  पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी, प्रा.आबाजी खराटे, प्रा.सतिश बंरकुटे, श्री अरूण डुब्बेवार, प्राध्यापकवर्ग  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या