💥चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीनुसार हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने व्हायरसची निर्मिती केल्याचा सशय💥
चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविड-19) थैमान घातले आहे.चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या 1770 वर पोहोचली आहे तसेच 70,548 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत लागण झाली आहे. तैवान, फिलिपिन्स, हाँगकाँग,जपान, फ्रान्समध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांश लोक हुबेई प्रांतातील आहेत. वुहान शहरातून कोरोनाची साथ जगभरात पसरली आहे. मात्र आता चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती झाल्याची चर्चा सुरू आहे.वुहानमधील फिश मार्केट येथील एका सरकारी प्रयोगशाळेतून हा कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील सरकारी साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीनुसार, हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC) ने हा व्हायरसची निर्मिती केली असावी. शास्त्रज्ञ बोताओ शाओ आणि ली शाओ यांच्या दाव्यानुसार याप्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा काही प्राण्यांना ठेवण्यात आले होते. यामध्ये 605 वटवाघळांचा समावेश होता. याच प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसची निर्मिती झाली असावी अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रयोगासाठी ठेवण्यात आलेल्या वटवाघळांपैकी एका वटवाघळाने एका संशोधकावर हल्ला केला होता. त्यावेळी वटवाघळाचे रक्त त्या संशोधकाच्या शरीरात गेले असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच रुग्णांमध्ये आढळलेले जीनोम सिक्वेंस 96 किंवा 89 टक्के होते. जे बॅट CoC ZC45 कोरोना व्हायरससारखी आहे. मात्र हा व्हायरस रायनोफस एफिनिसमध्ये आढळतो. जपानमधील बंदरापासून दूरवर डायमंड प्रिन्सेस या क्रूझवर असलेल्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले 99 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या क्रूझवरील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 454 झाली आहे.जपानचे नवे राजा नारुहितो यांच्या वाढदिवसानिमित्त 23 फेब्रुवारी रोजी आयोजिलेला सार्वजनिक समारंभ कोरोनाची साथ आणखी पसरण्याची भीती असल्याने रद्द करण्यात आला. नारुहितो यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी नागरिकांना राजवाड्यात प्रवेश देण्यात येणार होता; पण तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. डायमंड प्रिन्सेस क्रूझवर अडकलेल्यांपैकी सुमारे 300 अमेरिकी नागरिकांना एका विशेष विमानाने अमेरिकेत आणण्यात आले. त्यातील 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांना विमानातील स्वतंत्र कक्षात बसविण्यात आले होते....
0 टिप्पण्या