💥महामारी फार मोठे संकट,अशा काळात समाजाने स्वतः शिस्तीचे पालन करावे - हभप.आकाश महाराज खोकले💥
देशावर जगावर येणाऱ्या प्रत्येक आपत्तीमध्ये संयम आत्मविश्वास सहयोग सेवा यासारख्या गोष्टी अध्यात्मातून शिकविल्या जातात त्यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे समाजाला या विषयी जागृत करून खबरदारी घेण्यासाठी व घाबरू नये यासाठी प्रबोधन करावे दररोज वाढत चाललेली ही महामारी फार मोठे संकट आहे अशा काळात समाजाने स्वतः शिस्तीचे पालन करावे अनुशासन हे शासनापेक्षा अधिक प्रभावी असते त्यासाठी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या नावातच राष्ट्र हा शब्द असल्याने आपल्याला या कार्यात सहभागी व्हायचे आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून किर्तन प्रवचन कथाकार यांनी व्हिडीओ च्या माध्यमातून घरीच राहून नामस्मरण करणे तसेच राष्ट्र सेवा करणाऱ्या सर्व आरोग्य विभागासह सर्वाना आपल्या गायन वादन कलेतून अभंग श्लोक याद्वारे धन्यवाद द्यावे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री प्रशासकीय अधिकारी यांच्या सूचनांचे जनतेने पालन करावे यासाठी प्रसार करावा.*
*!! एकमेका साह्य करू ! अवघे धरू सुपंथ !!*
*श्री-ह-भ-प-आकाश महाराज खोकले*
*जिल्हा अध्यक्ष परभणी*
*राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य*
*मो.९७६७६६६६९१*
0 टिप्पण्या