💥पहिल्यांदाच जग ‘मेड इन चायना विषाणू’ चा सामना करतो आहे💥
वुहानमध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण समोर येऊनही चीनने दीड-दोन महिने त्याबाबत कसलीच कार्यवाही केलेली नसल्यामुळे पाहता पाहता हा विषाणू जगभर पसरला. आज अमेरिका, इंग्लंड, संपूर्ण युरोप, भारतआदी १५० हून अधिक देशांना या विषाणूने मेटाकुटीला आणले आहे. अशा स्थितीत चीन मात्र हा विषाणू अमेरिकेने निर्माण केल्याचा प्रपोगाेंडा करत आहे. इतकेच नव्हे तर चीनमध्ये या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून ते हुकुमशाहीचे यश आहे, लोकशाही देशांत ते शक्य नाही, असा दावाही करत आहे. गेल्या २०-२५ वर्षांत भारतातील बाजारपेठा चीनी मालाने काबिज केलेल्या आपण पाहिल्या. आज आपण मेड इन चायना लिहिलेली अनेक उत्पादने विकत घेतो; परंतू पहिल्यांदाच जग ‘मेड इन चायना विषाणू’चा सामना करतो आहे. जगाने यामधून धडा घेणे महत्त्वाचे आहे.
-------------------
आज संपूर्ण जगामध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. असुरक्षितता आहे, जीवनाविषयीची साशंकता आहे. याचे कारण आंतरराष्ट्रीय समुदायातील जवळपास १५० हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचा भयानक संसर्ग झाला आहे. सुमारे तीन लाखाहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. मृत्युमुखी पडणार्यांची संख्या १० हजाराहून अधिक आहे. इटलीमध्ये एका दिवसात ८००-१००० लोक मृत्युमुखी पडत आहेत. युरोपची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जर्मनी, ङ्ग्रान्स, इंग्लंड, स्पेन आणि इटली यापैकी इंग्लंड वगळता उर्वरित चार देश जे युरोपियन युनियनचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. भारतातही याचा संसर्ग वाढत असल्याचे त्याचे गांभीर्य ओळखून निम्मा देश लॉकडाऊन कऱण्याचा निर्णय घेतला आहे.एकंदरीत पाहता गेल्या जवळपास ५० वषार्ंमध्ये संपूणर् जगात एकाच वेळी इतकी भयंकर परिस्थिती कधीच उद्भवल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे आजची परिस्थिती ओढवण्यासाठी कोण कारणीभूत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण अगदी गेल्या तीन चार महिन्यांपुर्वीपर्यंत कोरोना हे नावही कोणाला माहिती नव्हतं. अशा स्थितीत अवघ्या १०० दिवसांमध्ये या कोरोनाने अख्खे जग व्यापून टाकले आहे. जगाला या संकटात ढकलण्यास जबाबदार आहे तो केवळ आणि केवळ चीन.
जगालाही हे कळून चुकल्याचे लक्षात येऊ लागताच आता चीनमधील साम्यवादी पक्षाने मोठा प्रपोगंडा सुरू केला आहे. कारण कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात प्रचंड वेगाने होत असल्यामुळे चीनला आपण एकटे पडू अशी भीती वाटते आहे. संपूर्ण जग आपल्याविरोधात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, हे ओळखल्यामुळे चीनने आपल्या प्रपोगंडा विंगला सक्रिय केले आहे. या विंगध्ये लोकांना वेतन
देऊन, पैसे देऊन चीनच्या चांगुलपणाचा प्रचार जगभर केला जात असतो.
या प्रचार-बचाव नाट्याचाच एक भाग म्हणजे, कोरोना विषाणूचा प्रसार अमेरिकेने केला आहे, असा आरोप चीनकडून अधिकृतरित्या केला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनावर आम्ही नियंत्रण मिळवले असे चीनकडून सांगितले जात आहे. वुहानमध्ये आलेले डॉक्टर, नर्सेस आता पुन्हा आपल्या गावी परत जात आहेत, त्यांना लोक हिरोचा सन्मान देत आहेत असा प्रचार चीनकडून केला जात आहे. तसेच गेल्या ४८ तासांत वुहानमध्ये केवळ १ रूग्ण आढळला असून, संपूर्ण चीनमध्ये केवळ १३ रूग्ण आढळले आहेत, अशी आकडेवारी चीन प्रसृत करत आहे. या माध्यमातून चीन अजब दावा करत आहे, तो म्हणजे अमेरिका, युरोप यांसारख्या लोकशाही व्यवस्था असणार्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा ङ्गैलाव वेगाने होत आहे. याउलट चीनमध्ये हुकुमशाही राजवट असून आम्ही आमच्या देशात या विषाणूवर नियंत्रण मिळवले आहे. हे अत्यंत अतार्किक आणि बिनबुडाचे आरोप चीन करत आहे.
चीनच्या या दाव्यांमुळे, खोट्या आरोपांमुळे अनेकांच्या मनात संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. वास्तविक, कोरोना कोविड १९ या रोगाच्या प्रसाराला केवळ चीनच जबाबदार आहे. या सर्वांचे मूळ शोधले तर १७ नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रूग्ण आढळला होता. परंतु २० डिसेंबरपर्यंत चीनने यावर कोणतीही कारवाई केली नाही. डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या एकदम वाढून १५० च्या घरात गेली. वास्तविक, वुहानमधील डॉ. ली यांनी सार्ससारख्या एका विषाणूचा संसर्ग होत असून त्याची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चीन शासन-प्रशासनाला कळवले होते. परंतु त्यावेळी या डॉक्टरच्या म्हणण्याकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याला टॉर्चर करुन विषाणूविषयी केलेले पहिले वक्तव्य त्याला बदलण्यास भाग पाडले. त्याला नवीन माहिती देण्याचा हुकुम देण्यात आला. काही दिवसांनी डॉ. ली यांचा याच विषाणूमुळे मृत्यू झाला. वास्तविक, पहिला रुग्ण आढळल्यानंतर चीनच्या हाती दीड महिना होता. त्या दीड महिन्यात चीनने या विषाणूवर नियंत्रण ठेवले असते तर त्याचा प्रसार जागतिक पातळीवर झालाच नसता आणि कसलाही दोष नसताना जग या महाभयंकर संकटात सापडलेच नसते. परंतु तब्बल दीड महिने चीनचे शासन-प्रशासन याबाबत अत्यंत शांत राहिले. त्याचे गंभीर दुष्परिणाम जगाला भोगावे लागत आहेत.
कौतुक करणे किंवा त्यांचे अनुकरण करण्याचे सल्ले देणे हे आततायीपणाचे आणि चुकीचे ठरु शकते.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चीनमधील अनेक पत्रकार गायब झालेले आहेत. या पत्रकारांचा कित्येक दिवसांपासून पत्ता नाहीये. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकारांना चीनने चीनबाहेर काढायचे ठरवले आहे. त्यांना तशी वॉर्निंगही देण्यात आली आहे. चीन हे सर्व करतो आहे त्यामागे एक महत्त्वाचा भाग आहे. चीनमध्ये जो साम्यवादी पक्षात मोठ्या प्रमाणावर यादवी सुरु आहे. त्यात दोन गट पडले आहेत. त्यातील एक गट हा शी जिनपिंग यांच्या बाजूचा आहे. परंतू दुसरा एक मोठा गट त्यांच्या नेतृत्वाला विरोध करणारा आहे. हा गट शी जिनपिंग यांना खाली खेचण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांना कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळवले आहे हे दाखवणे गरजेचे होते. अन्यथा त्यांना सत्तेत राहाणे अवघड आहे. म्हणूनच जिनपिंग यांनी अशा प्रकारचा प्रपोगंडा करायला सुरूवात केली. यातील एक महत्त्वाचा भाग समोर येतो आहे ते म्हणजे कोरोनाचा प्रसार चीनकडून झाला, असा आरोप युरोपियन देश विशेषतः अमेरिका आरोप करत आहेत; पण आशियाई देश मात्र मुळीच चीनवर आरोप करत नाहीयेत. दक्षिण कोरिया हा चीननंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाने प्रभालिथ झालेला देश आहे. मात्र दक्षिण कोरियाने अजुनही चीनवरून येणारी विमाने बंद केलेली नाहीत. सिंगापूरनेही चीनवरून येणारी विमाने बंद केली नाहीत. तसेच सिंगापूरने तर या कोरोना विषाणूला कोरोना न म्हणता वेगळ्या प्रकारचा विषाणू असे म्हणत आहे. यातून या विषाणूचा संसर्ग चीनकडून झाला असे सिंगापूरला दाखवायचे नाहीये. कंबोडिया, लाओस, म्यानमार यांसारख्या देशांनीही चीनकडून येणारी विमाने रद्द केलेली नाहीत. पाकिस्तानही याच यादीत आहे. जगभरातून कोरोनाच्या संसर्गाचा बातम्या बाहेर येताहेत; पण पाकिस्तानविषयी बातम्या येत नाहीयेत. तैवान, हॉंगकॉंगमध्येही कोरोना संसर्ग वाढत आहे. पण तिथल्याही बातम्या बाहेर येत नाहीयेत. असे का? याचे कारण हे देश पूर्णतः चीनच्या अधिपत्याखालील देश आहेत. चीनने या देशांमध्ये अब्जावधीची गुंतवणूक केल्या आहेत. चीनने पाकिस्तान, लाओस, कंबोडिया, म्यानमार या सर्वच देशांमध्ये गुंतवणुका केल्या आहेत. त्यामुळे हे कोणीही देश चीनविषयी अवाक्षर काढत नाहीत. हे सर्व देश चीनला घाबरतात. आजच्या घडीला ङ्गक्त अमेरिकाच चीनविरोधात बोलताना दिसते आहे. पण चीनने इतक्या मोठ्या प्रमाणात प्रपोगंडा केला आहे की पाश्चिमात्य माध्यमे देखील साशंक झाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक निवडणुकीच्या राजकारणासाठी चीनची बाजू उचलून धरताना दिसताहेत. या सर्वामुळे जागतिक पातळीवर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पण चीन हाच यातील खलनायक आहे.
आजघडीला जगामध्ये सर्वाधिक पर्यटन करण्यात चीनी मनुष्य आघाडीवर आहे. दरवर्षी जगातील वेगवेगळ्या देशांना सुमारे १५ कोटी चीनी पर्यटक भेटी देत असतात. त्यांच्याकडून सुमारे २० लाख कोटी रूपये पर्यटनावर खर्च केले जातात. एक महत्त्वाची बाब म्हणजे चीननंतर इटली हा दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक कोरोनाग्रस्त बाधित देश आहे. याचे कारण गेल्या वर्षी सुमारे ४० लाख चिनी पर्यटकांनी इटलीला भेट दिली होती. इटली हा चिनी पर्यटकांचा आवडता देश आहे. कोरोना विषाणूचा प्रसार नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत चीनमध्ये होत होता, या दोन अडीच महिन्यांच्या काळात अनेक चीनी लोकांनी इटलीला भेट दिली. त्या पर्यटकांमुळे इटलीमध्ये हा रोग पसरला. इटलीनेही या आजाराला गांभीर्याने घेतले नाही. परिणामी आज तेथे हाहाकार माजला आहे. पण त्याचीही मुळे चीनमध्येच आहेत. गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये इटलीने चीनमधून येणारी विमानसेवा बंद केली नव्हती. चीनी पर्यटक इटलीमध्ये जातच होते. त्यातूनच कोरोनाचा प्रसार इटलीमध्ये झाला, युरोपमध्ये झाला.
गेल्या २०-२५ वर्षांत भारतातील बाजारपेठा चीनी मालाने काबिज केलेल्या आपण पाहिल्या. आज आपण मेड इन चायना लिहिलेली अनेक उत्पादने विकत घेतो; परंतू पहिल्यांदाच जग ‘मेड इन चायना विषाणू’चा सामना करतो आहे. जगाने यामधून धडा घेणे महत्त्वाचे आहे.
0 टिप्पण्या