💥पुर्णेत सुनील जाधव मित्र परिवाराने केले पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना मास्क व साबणचे वाटप..!



💥सौ.सुनीताताई गायकवाड या बहिणीने आपल्या खाकीवर्दीतील रक्षणकर्त्या भावांना भरवला मायेचा घास💥

पुर्णा/राज्यात कोरोना विषाणूंचा धोका वाढल्याने या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नए याकरिता शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन संचारबंदीची घोषणा केली या भयावह परिस्थितीत ही स्वतःचा जिव धोक्यात घालून जनसामान्यांसाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करीत येथील मा.नगरसेवक सुनीलभाऊ जाधव मित्र परिवाराच्या वतीन आज रविवार दि.२९ मार्च रोजी रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास
मास्क व हात धुण्यासाठी लाईफबॉय साबणचे वितरण करण्यात आले.तर सौ.सुनीताताई रवींद्र गायकवाड या बहिणीने आपल्या खाकीवर्दीतील दिवसरात्र उपाशीपोटी जिवावर उध्दार होऊन जनसामान्यांचे रक्षण करणाऱ्या भावांच्या पोटाला दोन घास अन्न मिळावे याकरिता जेवणाची व्यवस्था म्हणून स्वतःच्या हस्ते वेज पुलाव करुन तयार करुन कुटुंबातील त्यांचे सुपूत्र शुभम रविद्र गायकवाड पती श्री. रविंद्रजी गायकवाड व बंधू शंकर खरात यांच्या हस्ते हात साफ करण्यास सैनिटायजर थंड पाणी प्लेटसह पाठवून दिले यावेळी उपस्थित पुर्णा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी पो.नि.गोवर्धन भुमे,स.पो.नि.प्रविण धुमाळ,स.पो.उप.नि.गंधमवाड,पोहेकॉ.नितीन वडदकर,पोहेकॉ.सय्यद मोईन,
पोहेकॉ.रत्ने,पोहेकॉ.रणखांब,डिएसबीचे चन्नावार,आदींसह असंख्य कर्मचाऱ्यांनी गायकवाड परिवाराने पाठवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला यावेळी पो.नि.गोवर्धन भुमे यांनी सुनीलभाऊ जाधव मित्र परिवार व गायकवाड परिवारा विषयी आभार व्यक्त केले.यावेळी कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोका ओळखून विशेष खबरदारी म्हणून अधिकारी/कर्मचाऱ्यांसह कार्यक्रम आयोजकांनी शासनाच्या आदेशाचे विशेष पालन केले यावेळी सुनीलभाऊ जाधव मित्रमंडळाचे सर्वेसर्वा सुनीलभाऊ जाधव,महाबोधी न्युज चायनलचे पत्रकार प्रदिप नन्नवरे,पत्रकार मोहन लोखंडे,संतोष पुरी,गौस पठाण,श्रीनिवास तेजबंद महेंद्र कांबळे,शिल्पदीप भंडारे आदी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या