💥जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या 14 वर पोहोचली आहे💥
जिल्ह्यात कोराना बाधीत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 28 एप्रिल रोजी सकाळी आलेल्या अहवालानुसार सेनगाव येथील क्वारनटाईन सेंटर मधील पाच वर्षीय बालकाला कोव्हिड 19 ची लागण झाली आहे. त्याचे आई वडील हॉटस्पॉट ठिकाणावरून आले होते.त्यामुळे त्याना सेनगावत क्वारंनटाईन करण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या 14 वर पोहोचली आहे.
27 एप्रिल पर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण तेरा व्यक्तींना कोरोना ची लागण झाली आहे यात एस आर पी एफ हिंगोलीचे 11 जवान व एस आर पी एफ जालना चा एक जवान असे एकूण 12 जवान कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर एस आर पी एफ जालना जवानाच्या संपर्कातील एकाला कोविंड 19 ची लागण झाली आहे. हे सर्व तेरा जण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वाढ 13 मध्ये भरती आहेत. क्वारंटाईन सेंटर सेनगाव येथील एका पाच वर्षीय बालकाला कोव्हिड-19 लागण झाल्याचा अहवाल 28 एप्रिल च्या सकाळी प्राप्त झाला आहे. जिल्ह्याची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. यापूर्वी एकाला कोरोनाची बाधा झाली होती तो रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेला आहे. या रुग्णाला मिळून जिल्ह्यात एकूण पंधरा रूग्ण आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्याने रेड झोन मध्ये प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरातच राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे...
0 टिप्पण्या