💥कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन नकरता शहरात फिरतांना आढळले💥
पुर्णा/कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक-डाऊन व कलम १४४ नुसार संचारबंदी लागु केली असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाने कोरोना (कोव्हीड १९) विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी आदेश लागु असतांना सार्वजनिक रोडने तोंडाला मास्क न लावता कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पसरविण्याच्या दृष्टीने आज सोमवार दि.१३ एप्रिल रोजी सायं.०६-४५ वाजेच्या सुमारास सपोनि.प्रविण धुमाळ,जमादार नितीन वडकर,डिएसबीचे गिरीश चन्नावार यांच्या पथकाला विनाकारण शहरातील बसस्थानक समोरील सार्वजनिक रोडवर फिरतांना दोघे जन आढळून आले त्यांची नावे गणेश बलबीरसिंग बहोत रा.पाटबंधारे विभाग कँम्प पुर्णा व शिवराज नरसिंग नायडू रा.व्यंकटी प्लॉट पुर्णा अशी असून या दोन्ही आरोपीं विरोधात फिर्यादी पो.ना.नागनाथ भागवतराव पोते यांच्या फिर्यादी वरुन पुर्णा पोलीस स्थानकात गुरनं.१४०/२०२० कलम २६९,१८८ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास जमादार नितीन वडकर हे करीत आहेत...
0 टिप्पण्या