💥कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता नागरिकांच्या सुरक्षेसाठी लावलेले कठडे तोडून टिप्पर चालकाचा वसाहतीत प्रवेश💥
परभणी/जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कोरोना विषाणूं पासून नागरिकांना वाचवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काटेकोरपणे यंत्रणा राबवली असून या यंत्रणेचाच एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात शहर-गाव पातळीवर नागरी वसाहतींमध्ये कठडे तयार करून प्रवेशबंदी लागू केली असतांना तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहतूक बंद केली असतांना
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यामुळे एकबाल नगरातील नागरीकांनी गल्लीबोळीतील रस्ते बंद केले आहेत.
जिल्ह्यात तसेच शहरासह तालुक्यात अत्यावश्यक सेवेची वाहून वगळता कुठल्याही वाहणांना रस्त्यावर येण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बंदी घातली असतांनाही शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास चोरट्या वाळूने भरलेला टिप्पर घेऊन येणार्या चालकाने एकबाल नगरातील रहिवासी नागरिकांनी कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी लावलेले लाकडाचे,लोखंडाचे कठडे काढत परिसरात टिप्पर घुसवला यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या शेख इरफान यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी रस्त्यावर तटबंदी लावली आहे ती तु काढु नको असे चालकाला सांगितले परंतु चालकाने ही बाब मालक महेबुब उर्फ बबर्या यास सांगितली. यावेळी टिप्पर मालक सोबत दोन ते तीन जणांना घेऊन शेख इरफान यांना तुझ्या बापाचा रस्ता आहे का ? टिप्पर इथुन पुढे का जाऊ देत नाहीस असे म्हणत मारण्यासाठी अंगावर धाऊन गेला.या प्रकरणी शेख इरफान शेख बाबु यांनी पूर्णा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन चार जणांविरुध्द किरकोळ स्वरुपाचा अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाउनमध्ये जिल्हाधिकार्यांचे आदेश धुडकाऊन विनापरवाना टिप्पर व कार आलीच कशी, सदरील टिप्पर व कारवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेख इरफान यांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे केली असल्याचे समजते...
0 टिप्पण्या