💥परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पो.अ.कृष्णकांत उपाध्याय जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतः उतरले मैदानात...!



💥परभणी शहरातील विविध भागात फिरून घराबाहेर न निघण्याचे नागरिकांना केले आवाहन💥
     
  परभणी, दि. 22:- राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढणारा संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्वतः शहरातील विविध भागांमध्ये जाऊन लोकांची होणारी गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सिंग उडणारा फज्जा लक्षात घेऊन व जिल्ह्यातील सर्व सीमा बंद असून चोर मार्गाने /आडमार्गाने येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांचे पथक नेमून अहोरात्र जनजागृतीची मोहीम राबवत आहेत ... तसेच पोलीस अधीक्षक श्री. उपाध्याय यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊन चे पालन करून घराबाहेर न निघता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेस केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या