💥परभणीतील गंगाखेडरोडवरील दालमील मध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल्स जुगार अड्डयावर पोलीसांची धाड...!



💥हाय प्रोफाईल जुगारड्यांकडून जुगार साहित्यासह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त💥

 परभणी-/ शहरातील गंगाखेडरोड वरील एका बंद असलेल्या दालमिलवर मागील अनेक दिवसांपासून लॉक-डाऊन संचारबंदीत हाय प्रोफाईल जुगारड्यांकडून जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदरील जुगार अड्ड्यावर धाड टाकून तेथे  जुगार खेळत असलेल्या बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून सुमारे 8लाख 6 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या जुगार खेळणाऱ्यात शहरातील अनेक प्रतिष्ठीताचा समावेश असून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
     
       अधिक माहिती अशी की, गंगाखेड रस्त्यावर एका नर्सरी समोर जुगलकिशोर दरक यांच्या बंद असलेल्या दालमिलच्या  मोकळ्या जागेत मोठा जुगार चालू असल्याची महिती पोलिसांना मिळाली. बुधवारी रात्री सुमारे 9 .15 च्या सुमारास पोलिसांच्या एक विशेष पथकाने येथे धाड घातली असता तेथे जुगार खेळत असलेल्या एकूण बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून 8 लाख 6 हजार 40 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला यात रोख रक्कम ,मोबाईल,व दुचाकींचा समावेश आहे या बारा आरोपींवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
   
             पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्यय यांच्या मार्गदर्शना खाली स.पो.नि एच.जी.पांचाळ , स.प.उ.नि हनुमान काछवे, सखाराम टेकुळे, श्रीकांत घांसावंत,अतुल कांदे,वनोले , महिला पोलीस पूजा भोरगे आदींनी सहभाग घेतला  या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या