💥परभणी जिल्ह्यातील लॉकडाऊन उठविण्यासाठी खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट...!



💥खा.संजय जाधव व आ.डॉ.राहूल पाटील यांनी आज घेतली जिल्हाधिकारी मुगळीकर यांची भेट💥

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक व्यापारी अडचणी आले आहेत. अनेक रोजगार बंद पडण्याची वेळ आली आहे. परंतू आता जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेला एकही रुग्ण नाही. त्यामुळे सोमवार (दि.11) पासून जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथिलता देऊन हळू - हळू दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी परभणी खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहूल पाटील यांनी शुक्रवारी (दि.8) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन लागू केले होते. या लॉकडाऊन मुळे देशातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. वाहतुक व्यवस्था देखील बंद आहे. गेल्या दीड महिण्यापासूनची ही स्थिती आहे. राज्य शासनाने जिल्ह्याचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. यात ग्रीन, ऑरेंज व रेड हे तीन भाग असून परभणी जिल्हा हा सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे. तो आता ग्रीन मध्ये जाईल. राज्यातील ऑरेंज व ग्रीन झोन मध्ये असणाऱ्या काही जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे.  तेथील व्यवहार काही अंशी सुरु झाले आहेत. परिणामी रोजगार पुन्हा सुरु झाल्याने त्या जिल्ह्यातील आर्थिक चक्र फिरण्यास सुरुवात झाली आहे. परभणी जिल्हा हा देखील ऑरेंज झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यात ही लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनानी केली होती. या संदर्भात काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहूल पाटील यांची भेट घेवून अडचण व्यक्त केली होती. या संदर्भात खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहूल पाटील या दोघांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. त्यांना लॉकडाऊनमध्ये आपल्या जिल्ह्याला शिथिलता द्यावी अशी विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यावर सकारत्मक विचार केला जाईल असे आश्वासन दोन्ही नेत्यांना दिले आहे. त्यामुळे येत्या सोमवार, दि. 11 मे पासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

---प्रतिक्रिया-----

व्यापाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे
लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. परंतू लॉकडाऊन उठल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वताची काळजी घेतली पाहिजे. सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन केले पाहिजे. व्यापाऱ्यांनी दुकानात जास्त गर्दी होणार नाही याची काळजी स्वताच घ्यावी लागेल.
- संजय जाधव, खासदार, परभणी

-----

लोकांनी ही गर्दी करू नये
लॉकडाऊन उठले म्हणजे कोरोनाचा संसर्ग संपला असे होत नाही. ही लढाई अजूनही चालणार आहे. त्यामुळे जिल्हयात लॉकडाऊनला शिथिलता मिळाली तरी लोकांनी बाजारात विनाकारण गर्दी करून नये. स्वताचे नियम स्वता पाळावे लागतील. तरच या संसर्गापासून आपला जिल्हा वाचेल.
- डॉ.राहूल पाटील, आमदार, परभणी

............END-----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या