💥जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या २४८३ तर ६८ कोरोना संशयितांच्या स्वॅबचे अहवाल अद्यापही प्रलंबीत💥
परभणी (दि.०८ जुन)-जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार रोजी दि.०८ जुन रोजी सायं.०६-०० वाजेपर्यंत एकूण ४ संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या २४८३ पर्यंत पोचली आहे. ६८ कोरोना संशयितांच्या स्वॅबचे अहवाल अद्यापही प्रलंबीत आहेत.
जिल्ह्यातील एकूण २६६४ पैकी २३९० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ८९ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ८० कोरोना संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. ३७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाला. एकूण ६८ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून सोमवारी एकूण ९ जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळ पर्यंत एकाही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला नाही.
जिल्हा शासकीय रूग्णालयात सोमवारपर्यंत विलगिकरण कक्षात ३९६,रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात ९३ जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले १९९४ जण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
दरम्यान, पूर्णा येथील फुले नगरातील २ वर्षीय मुलगी,१३ व १२ वर्षीय २ मुले, माटेगावातील ३ महिला वयोगट ८,१९ व ३० वर्ष तसेच ३ पुरूष १३,१६ व ४० वर्ष तसेच गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील १ पुरूष वय ६० वर्ष व २ महिला वय ५५ असे एकूण १२ कोरोनामुक्त रुग्णांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.....
0 टिप्पण्या