☀️प्रखर सूर्यालाही आव्हान देणारा तेजपुंज काजवा डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा....!



☀️छातीतल्या पिंजऱ्यात धडधडणाऱ्या हृदयात सतत अग्नी होम धगधगत राहिला पाहिजे☀️

लेखक - सतीश सातोनकर
 साहेब भाग 2

 मित्रांनो आग ही लायटर मध्ये अथवा काडी च्या डब्बित अथवा चुलीत असून काही उपयोग नाही आग लागते ती छातीमध्ये छातीतल्या पिंजऱ्यात धडधडणाऱ्या हृदयात सतत अग्नी  होम धगधगत राहिला पाहिजे त्याला आपण जिवंतपणाचे लक्षण म्हणतो.. या जगामध्ये विपरीत परिस्थितीच्या विरुद्ध लढणे हा काही लोकांचा जन्मजात स्वभाव असतो ईश्वर आणि त्यांना दिलेली ही सर्वोच्च देणगी असते, 35 वर्षांपूर्वी डॉक्टरांना पगारही  मेडिकल, वैद्यकीय अधिकारी या पदावर कासारशिरसी येथे नियुक्त होते, त्यामुळे पगारही चांगला होता, त्याचबरोबर समाजात मान-सन्मान हात उच्च दर्जाचा  होताच की, भाषा सज्जन पुरुषाला धार्मिक प्रचंड आस्था , शेंदूर लावलेला दगड काय भगवा वस्त्र बांधलेला झाडाला सुद्धा लावून जमिनीवर डोकं टेकून नमस्कार केल्याशिवाय डॉक्टर पुढे जाणारच नाही हे तुम्हाला कोणीही सांगेल, याचे विश्लेषण करत असताना या जिल्ह्यामध्ये परभणी अशोक हिंगोली जिल्हा असो चांगल्या राजकारणी अभ्यासू चारित्र्यसंपन्न राजकारण्यांना येणे केले प्रकारे संपवण्याचे पराजित करण्याचे प्रकार का होतात, मित्रांनो यावर खरंच गांभीर्याने चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतोय

 मी तुम्हाला या जिल्ह्याच्या 19 व्या शतकाच्या सुरुवातीला घेऊन जातो, काय होता हा जिल्हा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, उदाहरणार्थ पाथरी तालुक्यातील गोदाकाठच्या सुपीक भागाचे जागीरदार ,देशमुख चौधरी, राजे व्यंकटराव लिंबेकर आजही तुम्ही पाथरी तालुक्यातील लिंबा या गावी भेट दिल्यास असे लक्षात येईल त्या गावच्या पाठीवर पूर्वी लिंबा देशमुख असे लिहिलेलं असायचं देशमुख काढून टाकले आता फक्त लिंबा लिहिलंय, महानुभाव पंथाचा देगाव गड आहे अटकेपार महानुभाव पंथाचा प्रचार करणारे नागदेवाचार्य यांचा जन्मस्थळ म्हणजेच देशमुखांची जहागिरी लिंबा, तिथून थोड्याच अंतरावर सोनपेठ च्या अगदी जवळ गोदाकाठी लीळाचरित्र हा महान ग्रंथ लिहिण्यात आला, भारतातील अगदी मोठे उद्योगपती व वरिष्ठ अधिकारी मला सतत विचारत आमच्या महाराजांची समाधी नागदेवाचार्य यांची समाधी लिंबा या गावात आहे लिंबा हे गाव कुठे आहे आणि त्यांची समाधी कुठे आहे ते आम्हाला शोधून द्या तुम्हाला खरच सांगतो भल्याभल्यांच्या पॅंटी पिवळ्या होतील इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी गोदाकाठ माझ्याबरोबर पायी फिरले आणि लिंबामध्ये समाधीचे नतमस्तक खून दर्शन घेतले, त्यानंतर समोरच देशमुखांची व्यंकटराव लिंबेकर साहेबांच्या घडीचा ते इतिहास विचारत, मित्रांनो मी त्या गाडीचा अभ्यास सुरू केला त्या घराण्याचा अभ्यास सुरू केला त्यांना घनसांगवी ला एक गडी होती दुसरी सेलू तालुक्यातील हात्रुन येथे घडी होती आणि तिसरी लिंबा देशमुख येथे होती आणि पाथरी या गावांमध्ये तर त्यांची फैसला करणारी आदालत होती, मित्रांनो साडेबारा हजार हेक्टरी जमिनीचा हा मालक, प्रचंड मोठ्या आणि ऐतिहासिक अशा  प्राचीन महादेव मंदिर हातनुर, रावणवधानंतर प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण ची गाणी जा महादेवाचा रत्नानी अभिषेक केला ते स्थान म्हणजे रत्नेश्वर रामपुरी चे प्राचीन असे अद्भुत असे महादेवाचे मंदिर  लिंबेकर राजघराण्यांनी बांधली, याचा दस्तावेज भारत सरकारकडे ही आहे आणि निजाम काळातील दत्ता वेळेस आजही तुम्हाला सेंट्रल लायब्ररी हैदराबाद मध्ये दिसेल, 1923 ला या घराण्याकडे दकोटा हे त्याकाळचे राजा महाराजांनी वापरायचे विमान राष्ट्राध्यक्षांनी वापरायची विमान हैदराबादच्या विमानतळावर उभे असायचे, जुन्या परभणी जिल्ह्यातल्या एका माणसाकडे स्वतःचे विमान 1923 ला होते, याचा लेखी दस्तावेज आहे बर का, मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल आज या घराण्याकडे स्वतःची एक गुंठा ही जमीन व्यवस्थेने शिल्लक ठेवली नाही,  1940 च्या पत्रावर आहारामध्ये निजाम हरिप्रसाद यांना पत्र लिहिताना असं म्हणतात लिंबाच्या देशमुखांकडे निजामाची चौथाई उत्पन्नाचा इतके पैसे आहेत, तुम्हाला खर्च व्हायला पैसे कमी पडले तर तुम्ही लिंबा देशमुख कडून उधार घ्यावे, स्वातंत्र्यानंतर राजे व्यंकटराव लिंबेकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची पत्रव्यवहार करून सेलू तालुक्यातील आपली दोन हजार एकर जमीन ही सैन्यदलाच्या शास्त्राचा निर्माण करण्याच्या कारखान्यासाठी मी मुक्त देण्यास तयार आहे असे कागदपत्र व पत्रव्यवहार त्यांनी दाखल केला होता, एवढा एकच उदार स्वभाव राजांना महाग पडला आणि कट कारस्थान करू  आज राजाच्याच वंशजांना भूमिहीन जीवन जगावे लागत आहे, आपल्याकडे हजारो लाखो लिटर पवित्र दुधामध्ये एक थेंब लिंबू टाकून दूध सोडवणारी टोळ्या सक्रिय आहेत,

 दुसरे उदाहरण परभणी तालुक्यातील नऊ किलोमीटर अंतरावर टाकळी या गावचे आनंद शर्मा एकेकाळी ह्या माणसाची भारताच्या चार महानगरांमध्ये स्वतःची कार्यालय होती, किर्लोस्कर कंपनीचे हे भारतातील एक आघाडीचे वितरक होते, यांची सुरुवात  परभणी शहरातील क्रांती चौकातून किर्लोस्कर इंजिनाचे  ठोक विक्रेते म्हणून झाली होती, मित्रांनो या माणसाचा उल्लेख करण्याचं कारण यासाठी आपल्या बौद्धिक क्षमतेच्या व व्यापारी बुद्धीचा क्षमतेवर या माणसाने वैश्विक स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण करायला सुरुवात केली होती 1949 ला त्याकाळी युरोपातील युगोसलाविया सरकारची करार करून हैदराबाद स्थित नाचाराम इंडस्ट्रियल एरिया मध्ये दक्षिण देशातला पहिला ट्रॅक्टर कारखाना उभा करणाऱ्या माणसाचं नाव आनंद शर्मा.... आजही तुम्हाला त्याच कारखान्याच्या स्थापनेचा प्रमुख अध्यक्ष म्हणून मालक म्हणून त्यांचा उल्लेख दिसेल... स्वतः किर्लोस्कर घराणे
 आनंद शर्मा साहेबांना जावई म्हणून स्विकारू पाहत होते, हा माणूस  आपल्या व्यापारामध्ये इतका व्यस्त होता किर्लोस्करांनी पाठवलेल्या सचिवाला त्यांनी उत्तर दिले माझ्याकडे तीन वर्षानंतर  आपल्या  मुली बरोबर लग्न करण्यासाठी वेळ आहे, लोक उद्योग करण्याची मोठ्या राजकारण्याची आपले संबंध आहेत म्हणून फोटो काढून आपल्या घरात लावतात, आणि या जिल्ह्याच्या  सुवर्ण मातीत जन्माला आलेला हा महान  जागतिक दर्जाच्या उद्योगपती चे नेमके झाले काय, प्रचंड चारित्र्य स्वाभिमान आणि मेहनत करण्याची तयारी प्रामाणिकता, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आणि त्यांना एकदा झपाटून गेलेला माणूस अक्षरशः वेड्यासारखा वाटतो, त्यांचेही आपल्या भागातील लिंबू मिळणाऱ्या टोळीने हैदराबादला प्रत्येक वेळेला जाऊन जाऊन आनंद शर्माला बोर्डातून काढून टाका आहात तुमचं काहीच करू शकत नाही, याचं काय खर आहे याला मी ओळखतो असे म्हणून त्या उद्योगपतीचा त्या बोर्डातून काढायला भाग पाडले, त्याचा पुराव्यानिशी माझ्याकडे अभ्यास आहे माझ्या येणाऱ्या पुस्तकांमध्ये नेते मांडतोय, मला एकच सांगायचे भारतच नाही तर दक्षिण एशिया मध्ये पहिला ट्रॅक्टर कारखाना उभा करणारा माणूस या भागातला आपल्या मातीतला आपण त्याची उभ्याने माती केली, माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा साहेबांचे ते नात्यांमध्ये अत्यंत जवळचे संबंध होते शंकर दयाळ शर्मा साहेबांच्या शपथविधीचे निमंत्रण परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना मिळाले होते, त्याकाळी ते नाना पेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला दीपक काळे यांच्या व या पुस्तकाच्या दुकानावर  बसत असत, हाताच्या शेवटच्या करंगळी मध्ये  बिडी  विदेशी ट्रिपल फाईव्ह सिगारेटच्या  पिण्याच्या इंग्रजी स्टाईलने थोडी हाताचा कोपरा एकत्र करून जोरदार  बिडीचा धूर छातीमध्ये ओढायचे, रीचनेस जर ब्लड मध्ये असेल, रॉयल्टी ती तुमच्या वागण्यातून येते, नाहीतर 40 40 वर्षे सत्तेमध्ये राहून घरी काम करणाऱ्या नोकराची सुद्धा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कमरेच्या खालच्या शिव्या देणाऱ्या नेत्यांना मी ओळखतो, कार्यकर्त्यांना तर अक्षरशः मंत्रोच्चार केल्यासारख्या आई-बहिणीवरून शिव्या देणाऱ्या नेत्यांना तुम्ही ओळखता आम्हीही ओळखतो, पद आणि सत्ता मिळाल्याने माणूस वागण्यामध्ये सुसंस्कृत होत नाही, राजे लिंबेकर यांचा इतिहास वाचत असताना अभ्यास करत असताना तर परभणी जिल्हा किती उंचीवर आणि किती श्रीमंत होता याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, तर आनंद शर्मा यांच्या औद्योगिक चळवळीतून परभणी जिल्हा जागतिक दशका नकाशावर गेला होता याचं भूषण नाही वाटत, आनंद सर्व साहेबांचे आपल्या लोकांनी जवळ राहून येवढं नुकसान केलं त्यांना ते माहीतही झालं, शेवटपर्यंत तरीही ते सगळ्यांशी चांगलं  वागत राहिले नुकसान करणाऱ्या व्यक्तीला जिवंतपणी पराजय स्वीकारायला लावला आपल्या उच्च वागण्यातून आणि सुंदर बोलण्यातून शत्रूलाही शर्मिंदा करून मारलं, जगण्याचा काय अंदाज आहे क्या बात है,

 मित्रांनो अगदी सत्तरच्या दशकामध्ये परभणी जिल्ह्यात दुसरा एक व्यक्तिमत्त्व जन्माला आला  आर्य वैश्य समाजातील अशोकराव  चित्रे वार साहेब. माणूस परभणी शहरात ला अरे त्यांची कामगिरी पहा काय आहे भारतामधून पहिल्यांदा समुद्रामधून तेल काढण्यासाठी चा परवाना मिळवणारा धीरूभाई अंबानी च्या अगोदर चा माणूस म्हणजे अशोकराव चिद्रवार, पुण्या मुंबईत आणि दिल्लीत फिरल्यानंतर कळतं की हा माणूस किती मोठा होता या माणसाला किती उच्च आणि किती भयानक आभाळा पेक्षाही मोठं स्वप्न पाहिलं होतं, भारत सरकार करून ओईल रिग मशीन चा  लायसन अथवा परवाना मिळवण्यासाठी युरोपातील स्वीडन या देशाची यांनी करार केला, तांत्रिकदृष्ट्या जपान सरकारची ही करार केला, त्याकाळी विदेशी गुंतवणुकीसाठी आरबीआयचा विशेष परवानगी लागायची, त्यावेळेसचे आरबीआयचे गव्हर्नर श्री जैन साहेब यांच्या समोर दोन माणसं बसलेली असायची, दोघांच्या फायली एक सारख्या तो परभणी शहरातल्या अशोक चित्रे वारांची फाईल ही त्रुटी नसलेली आणि स्पष्ट मान्यता मिळण्यासाठी योग्य अशी होती, त्यात दुसऱ्या व्यक्तीचे नाव होते अंबानी घराण्याचे मालक , इंडियन बिझनेस हाऊस चे टायफून श्री धीरूभाई अंबानी डोळ्यासमोर फक्त चित्र आणि विचार करा मुंगी न,कोणाशी स्पर्धा केली, आपल्या सर्व परभणीकर यांनी त्यांना मदत केली नाही, आणि दुर्दैव असे राजकीय पाठबळ नसल्यामुळे दिल्लीमध्ये राजकीय वजन नसल्यामुळे अशोक चित्रे वाऱ्यांची फाईल स्वीडन आणि जपानची मान्यता असतानाही नाकारण्यात आली, हे दोन्ही देश तांत्रिक व आर्थिक मदत द्यायला तयार असतानाही रिजेक्ट करण्यात आली व धीरूभाई अंबानी यांना बहाल करण्यात आली... आमचं मराठवाड्यातलं मराठी माणसाचं मन दिल्लीत इतकं ताकतवान आहोतच कोणी आम्हाला मदत करू शकेल, मी आजही रस्त्यात जर अशोकरावजी त्रिवार साहेब दिसले तर लोटांगण घालून पाया पडतो, आजूबाजूचे लोक विचारतात कोण आहे हा माणूस काय बोलावे...

 तशाच प्रकारे वसमत विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या  उमेदवारी वर जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेत पोहोचले कणखरपणे पाच वर्ष काम केलं सत्ता आल्यानंतर सहकारामध्ये मोठे बदल केले ते पन्नास वर्षात कोणीही करण्याची हिम्मत केली नव्हती त्या माणसांनी केले आणि त्याचीच किंमत आज  डॉक्टर साहेबांना, त्यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांना मोजावी लागत आहे,  आजच्या पिढीला कदाचित माहीत नसेल डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेबांनी  एक मोठा निर्णय घेतला व राज्य बँकेतून  एक नवी  Apex नावाची बँक सुरू केली कारण राज्य बँक ही काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे शिवसेना-भाजपा सरकारला ते कधीही मदत करत नव्हती किंवा पूरक राहत नव्हती, त्याकाळी मराठवाड्यातल्या एका माणसानं त्या राज्य बँकेचे दोन तुकडे करणे तोंडाचा खेळ नव्हता, आज शेतकऱ्यांची कर्ज माफ होतात तो त्य,दणक्यामुळे त्याचे विश्लेषण विस्तृत पुराव्यांनिशी एक दिवशी नक्की करेल, तेव्हापासूनच डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेबांच्या पाठीमागे कूटनीति चे राजकारण सुरू झाले, हा सांगायचे राहून गेले त्या काळी त्या बँकेचे चेअरमन व्हायला सुद्धा शिवसेना-भाजप मधला एकही नेता तयार नव्हता त्या  गोवा महाराष्ट्र अशा नावाची काहीतरी बँक करून शासनाने अध्यक्षपदाचा उमेदवार शोधायला सुरुवात केली उमेदवार मिळत नव्हता कोणी तयार आहे नव्हते सहकाराच्या बोक्याच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची श्री घंटा डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेबांनी आपल्या अत्यंत जवळचे स्नेही  हिंगोली चे सहकार महर्षी श्री ओमप्रकाश देवडा यांना त्या बँकेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली देवळा जी प्रचंड स्वाभिमानी व मराठवाड्याचा स्वाभिमान बाळगणारा माणूस होता पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार धोक्यांना न भिता लॉबीला न भिता नेते अध्यक्षपद भूषवले मग व्यवस्थित ती बँक चालवली, तिथूनच काँग्रेस सरकारच्या आर्थिक  नाड्या डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी खिळखिळ्या करून टाकल्या, कृष्णा खोरे च्या कामाचे देयके शेवटी याच बँकेच्या माध्यमातून दिल्याचे मला आठवते, पक्षासाठी आपले पद प्रतिष्ठा आपले राजकीय करियर राजकीय भविष्य डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेबांनी धोक्यात आणून ठेवले, त्यांनी पक्षहितासाठी तो धोका स्वीकारला, पेशाने डॉक्टर असलेल्या माणसाला विचार केल्यावर काय होतं हे माहीत नव्हतं काय??? परंतु नीलकंठ महेश्वरा सारखा त्यांनी अक्षरशः  आपल्या नीलकंठा मध्ये साठवून ठेवलं पिऊन टाकलं, हा त्याग  मांडला जावा जनता दरबारामध्ये तो ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, आपल्या विचारांशी आपल्या पक्षाची वंदनीय शिवसेनाप्रमुखांशी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी यापेक्षा मोठे  प्रमाणिक  एक निष्ठेचे त्यागाचे सर्वस्व त्यागाण्याची दुसरे कोणते उदाहरण असेल!? खरच की पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार लॉबीला दुखल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार मंत्री म्हणून आपल्या सरकारची बाजू मांडत असताना डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी जो त्याग केला त्याला महाराष्ट्राच्या राजकीय निष्ठेच्या इतिहासामध्ये दुसरे उदाहरण असले तर आपण दाखवून द्यावे, इतकं सगळं होऊनही डॉक्टर हसत राहतात सदैव हसमुख धन्य ते माता धन्य ते पिता जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, "टाकीचे घाव खाल्ल्याशिवाय मूर्तीला देवपण येत नाही" डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेब आपल्या त्यागमुर्ती  विशाल रदयाला, सत्यासाठी हलो हल, जहरी राजकीय  विष पचवून नही आपण किती शांत राहता, कोणीही  हिनवले ,डिवचले, अगदी खालच्या स्तरावर बोलायचे झाले तर जातिवाचक जन्म वाचत उपहास केला तरी त्याचे स्वागत करायचे आदरणीय डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेब तुम्ही जिवंतपणी महान दंतकथा झाला हात, राजकारणातील मंत्री-संत्री आमदार-खासदार या पदांचा पेक्षा कितीतरी उंच झाले आहात, काशी उंच उडणाऱ्या आहे महान गरुडा तुझ्या विशाल हृदयामध्ये माझ्यासारख्या चिमणीसाठी जागा राहू दे..... डॉक्टर जयप्रकाश मुंदडा साहेबांचा इतिहास लिहित असताना वर तीन लोकांचा जो इतिहास लिहिला तो यासाठी आम्ही आमच्या लोकांची कधीच कदर त केलीस नाही पण दोन शब्द चांगले बोललोही नाही या नैतिक गुन्ह्यातून मी माझी आज सुटका करून घेतली आहे डॉक्टर साहेब नासा आई भवानी दीर्घायु देवो आणि हो मला माहित आहे डॉक्टर साहेब तुम्ही स्वभावाने फिनिक्स पक्षासारखी आहात.... राखेतून पुन्हा आकाशी नवी झेप घेणार तयार..... शब्दांचा स्वीकार व्हावा भावनांचा स्वीकार व्हावा लेखक :सतीश सात वनकर,  परभणी,
 क्रमशः ...
 कृपया भाग तीन लवकरच देत आहोत... लॉक डाऊन च्या  टायपिंगच्या असुविधांमुळे लेखनातील चुका समजून घ्याव्यात ही नम्र विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या