💥अनुसूचित जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल💥
पालम /प्रतिनिधी तालुक्यातील मौजे सादलापुर येथील सौ रेवताबाई ज्ञानोबा गुंडले व ज्ञानोबा शंकर गुंडले या पती पत्नी च्या नावाने त्यांचे गावात किंवा पालम तालुक्यातील कोणत्याही गावात एक गुंठा सुद्धा त्यामुळे ते भूमिहीन आहेत करिता ते आपली उपजीविका भागविण्यासाठी पालम शहरामध्ये वास्तव्यास आहेत व ते भाजीपाला विक्री करून दैनंदिन उपजीविका भागवत असतात याचाच गैरफायदा घेत गावातील नागनाथ बापूराव धुळगंडे या इसमाने बोगस कागदपत्रे तयार करून बँकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यास हाताशी धरून पालम येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेतून वरील पती-पत्नीच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपये पिक कर्ज उचलले होते पण हे पीक कर्ज उचलल्याचे आज पर्यंत संबंधित व्यक्तींना काही माहिती नव्हते अचानकपणे महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे अशा सूचना दिल्या असल्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावाच्या तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर चावडीवाचन करण्यासाठी याद्या गावामध्ये पाठवण्यात आल्या होत्या त्यामध्ये फिर्यादीचे नाव व त्यांच्या पतीचे नाव दिसून आले त्यावेळी त्यांना ही आश्चर्य वाटले आज पर्यंत या बँकेकडून आम्ही एक रुपयाही कर्ज घेतलेले नाही किंवा कर्जमागणी प्रस्ताव दाखल केलेला नाही तरीही संबंधित बँकेचे कर्ज आमच्या नावाने दाखवण्यात येत आहे याचे मूळ कारण शोधले असता गावातील नागनाथ बापूराव धुळगंडे याने हा सर्व प्रकार केल्याचे समोर आले होते त्यामुळे या विषयी संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता त्याने वरील प्रकार आपण केला असून जे झाले ते झाले तुम्ही काहीही करू नका मी संपूर्ण पैसे बँकेत भरून देतो असे म्हटले होते त्यामुळे त्याने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवला आणि काही दिवस वाट पहावी म्हणून थांबून गेले पण संबंधित व्यक्तीने अद्यापही कर्ज भरले नाही त्यामुळे तुम्ही त्या बँकेचे कर्ज भरून तरी द्या अन्यथा पैसे आमच्या कडे द्या ते आम्ही भरून देतोत आणि कर्ज खाते निल करून घेतो असे बोलले असता तुम्हाला कशाचे पैसे द्यायचे असे म्हणत फिर्यादी महिलेस अर्वाच्य भाषेचा वापर करत जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारत संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना पाहून घेण्याची धमकी दिली असल्याने सदरील महिलेच्या फिर्यादी वरून पालम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायदा 1860 अन्वये कलम 504,506 अनुसूचित जाति अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम 3(1) ( r ) 3 (1) (s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले पूर्णा हे करत आहेत....
0 टिप्पण्या