💥नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ५ रुग्ण सापडले...!



💥जिल्ह्यात आता रुग्णांची संख्या २०८ वर पोहचली💥

मंगळवारी १० कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर बुधवारी आणखी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामघ्ये ईतवारा भागात आणखी २ रुग्ण सापडले असून एक रुग्ण फरांदेनगर, एक रुग्ण चौफाळा व एक रुग्ण खोजा 
कॉलनीतील आहे.नव्याने आढळून आलेल्या ५ रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या २०८ वर पोहचली आहे.

💥ईतवारा भागात रुग्ण वाढले !

ईतवारा भागात रुग्णांची संख्या वाढत चालली असून काल पांच जण कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यात आज २ नव्या रुग्णांची भर पडली आहे.या भागात एकूण आठ रुग्ण सापडले असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

💥कोरोनाने आपले क्षेत्र वाढवले !

शहरातील काही मर्यादित भागातच कोरोनाचा प्रभाव असताना कोरोनाने आता सर्वत्र आपले बस्तान मांडायला सुरुवात केली असून या आजाराने नवीन भागात प्रवेश केला आहे.चौफाळा, मालेगांव रोड,फरांदेनगर, सिडको
व खोजा कॉलनी भागात कोरोनाने आपले हातपाय पसरवले आहे.

💥धोक्याची घंटा..!

शहरातील वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने ही नांदेडकरांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.शहराचे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच लोकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने आपण स्वताहून कोरोनाला आमंत्रण देत आहोत असे दिसते.नियम काटेकोरपणे न पाळल्यास त्याचे परिणाम कोणी एका दुसऱ्याला नाही तर सर्वानाच भोगावे लागणार आहे

 💥बँकेतील अन्य कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू..!

महावीर चौक भागातील एका बँकेच्या या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर
या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले जात असल्याचे सांगण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या