💥परभणी जिल्ह्यातील मंदिर आणि प्रार्थनास्थळांच्या जमिन ताब्यात घेण्याचे आदेश....!



💥जिल्हा महसुल प्रशासनाच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडणार आहे💥

परभणी (दि.१२ जुन)-येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने काही गट/सर्व्हे नं मधील विरासत,पुर्नरिक्षण अर्ज हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम 1952 अन्वये फेटाऴण्यात आले असून सदरील जमिनी शासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश पारीत गेले आहेत. 16 जून रोजी पर्यंत त्याचा अहवाल द्यावा, असेही म्हटले आहे.

 त्यात विठ्ठल-रूख्माई मंदिर, मौजे कारेगाव येथील मशिद महेबुब शाही, मांडाखळी येथील जामा मशिद, परभणी तालुक्यात शर्त खिदमत कजात, तालुक्यातील मशीद मौजन, शर्त खिदमत कजात, शर्त खिदमत, शाही मशिद, शर्त खिदमत तुळशीबाग, मशिद मौजन, बालाजी मंदिर, दर्गाह इसाक मौलवीसाब, दैठणा येथील समाधीपुरी, दैठणा येथील बालाजी देवस्थान व पिंपळगाव सय्यदमियाँ येथील बालात्मज भाऊसाहेब देव,पेडगाव यांच्या गट/सर्वे नं, निर्धारीत क्षेत्र ताब्यात घ्यावे, असे उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुडेटकर यांनी म्हटले आहे. महसुल प्रशासनाच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या