💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांचा यांनी घेतला निर्णय💥
परभणी (दि.३० जुन) - परभणी जिल्ह्याच्या विविध भागात एकापाठोपाठ सलग कोरोना बांधीत रुग्ण आढळून येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिंतूर सोनपेठ तालुक्यात लागु केलेल्या संचारबंदी वाढवुन २ जुलै पर्यंत संचारबंदी लागू करीत असल्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी या दोन्ही शहरात दि.२८ जुन २०२० पासुन ३० जुन २०२० च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी घोषित केली होती.परंतु या भागात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पहाता पुन्हा संचारबंदीत वाढ केली आहे.
सोनपेठ व जिंतूर नगरपालिका व ३ किमीच्या परिसरात आज मंगळवार दि.३० जुन रोजी मध्यरात्री १२-०० वाजल्या पासून गुरूवार दि.२ जुलै २०२० चे मध्यरात्री १२-०० वाजेपर्यंत ही संचार बंदी राहील,असे प्रशासनाने म्हटले आहे...
0 टिप्पण्या