💥ताडकळसचे मंडळ कृषी अधिकारी निलेश आडसुळ, कृषी पर्यवेक्षक जी.पी.मते यांची प्रमुख उपस्थिती💥
ताडकळस / प्रतिनिधी
पुर्णा (दि.23 जुन) - तालुक्यातिल ताडकळस येथुन जवळच असलेल्या माखणी दि.22 जुन 2020 रोजी येथे कृषी विभाग मार्फत खरीप हंगामी मुग कडधान्य पिकाची महिला शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी ताडकळसचे मंडळ कृषी अधिकारी निलेश आडसुळ, कृषी पर्यवेक्षक जी.पी. मते, कृषी सहायक सुरेश काळे, रनेर मॅडम, पी.बी. ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती. शेंद्रिय शेती काळाची गरज व त्याचे फायदे, घरच्याघरी लिंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, सोयाबीन पिकावर येणाऱ्या हुमणी अळीचे नियंत्रण, सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करणे व त्याचे फायदे या विषयावर उपस्थित मान्यवरांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन बीजप्रक्रिया करूनच पिकाची पेरणी करावी असे आवाहन केले.
यावेळी कृषी विभागाच्या वतीने 25 महिला शेतकऱ्यांची शेती शाळेसाठी निवड करुन मुगाचे बियाने वाटप करण्यात आले.
प्रारंभी माखणी ग्रामस्थांच्या वतीने पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मिरा आवरगंड यांनी केले तर सुत्रसंचालन कृषीमित्र जनर्धन आवरगंड यांनी केले. कृषी सहायक रनेर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास महिला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उषा आवरगंड, उज्वला आवरगंड, माहानंदा भोसले आदींनी पुढाकार घेतला.
0 टिप्पण्या