💥परभणी जिल्ह्यात आज पुन्हा आढळलेश४ कोरोना बाधीत रुग्ण....!



💥आज रविवार दि.२८ जुन रोजी परभणी शहरात २ तर जिंतूर १,सोनपेठ १ असे ४ रुग्ण आढळले💥

परभणी (दि.२८ जुन) - जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा प्रार्दुभाव बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असताना पुन्हा आज रविवार दि.२८ जुन रोजी ४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यात परभणी शहरात २,तर जिंतूर, सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी १ कोरोना बांधीत रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या आता १०८ वर पोहचली आहे.

      परभणी शहरातील दोन, जिंतूर व सोनपेठ भागातील प्रत्येकी एक असे एकूण चार संशयित रुग्णाचा स्वॅब रविवार दि. २८ जुन रोजी पाॅजिटिव्ह आला आहे.परभणी शहरातील गंगापूर कॉलनी भागातील एक रुग्णाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरा  गव्हाणे चौकातील असल्याचे समजले आहे.सोनपेठ शहरातील राज महानगरातील एक रुग्ण तर जिंतूर तालुक्यातील एक असल्याचे सांगण्यात आले आहे एकूण रुग्णांची संख्या आता एकशे आठ पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी गर्दी टाळावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री वसमत रस्त्यावरील रामकृष्णनगरात पुण्याहून परतलेल्या एका डॉक्टरचा स्वॅब पॉझिटीव्ह आढळून आला होता.त्या डॉक्टरने परभणी ते पूणे असा दुचाकीद्वारे प्रवास केला. रविवारी ते परभणीत दाखल झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करिता गेले. त्यावेळी त्यांचा स्वॅब घेवून नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. त्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला. रुग्णांची संख्या १०८ एवढी झाली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या