💥परभणी जिल्ह्यात पुन्हा नव्याने ४ कोरोंनाबाधीत रुग्ण आढळले...!



💥कोरोना बाधीत रुग्णात शहरातील २ तर झरीतील २ रुग्णांचा समावेश💥

परभणी (दि.२ जुलै) -जिल्ह्यात कारोंनाबाधीत रुग्णांच्या संख्येत प्रत्येक दिवशी वाढ होतांना दिसत असून काल बुधवार दि.१ जुलै रोजी राञी दर्गा रस्त्यावरील २ तर झरीतील २ असे एकंदर ४ रूग्ण कोरोना पाॅजिटिव्ह आढळले आहेत.

परभणी थील जिल्हा शासकीय रुग्णालयात काल बुधवार दि.१ जुलै २०२० रोजी २२ संशयित दाखल झाले होते त्यामुळे आता एकूण कोरोना संशयितांची संख्या २७०२ एवढी झाली असून
जिल्हा शासकीय रुग्णालयातून बुधवारी पाच वाजेपर्यंत एकूण २३ संशयिताचे स्वॅब घेवून ते नांदेड येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.तेथील प्रयोग शाळेकडून प्राप्त स्वॅबच्या अहवालाप्रमाणे ४ व्यक्तीच्या स्वॅबचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.

या जिल्ह्यात संशयित रुग्णांची संख्या २७०२ एवढी, तर संक्रमीत कक्षात २३ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
आजपर्यंत २९०८ स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यापैकी २६३७ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.आतापर्यंत ८४ अनिर्णायक ४७ स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल  नांदेड प्रयोगशाळेद्वारे  प्राप्त झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२२ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला.९१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या