💥हैदराबाद ते मुदखेड या लोहमार्गा दरम्यान टिटीएएस नामक खास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे💥
परभणी (दि.३१ आक्टोंबर) ः दोन रेल्वेच्या धडकेचे अपघात टाळण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गुरुवार दि.३० आक्टोंबर २०२० पासून हैदराबाद ते मुदखेड या लोहमार्गावर दरम्यान टीटीएएस नामक खास यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
हैदराबादच्या मुदखेड सिकंदराबाद विभागातील उमरी आणि शिवणगाव स्थानकांदरम्यान २१.५ कि.मी. अंतरासाठी टीसीएएस हा प्रकल्प गुरुवारपासून यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला.
रेल्वे विभागाने प्रथमतःच या मार्गावर हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
भविष्यात टीसीएएस प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मनमाड - नांदेड - सिकंदराबाद - ढोणे - गुंताकल आणि बिदर - परळी - परभणी विभाग दरम्यान एक हजार दोनशे किलोमीटर अंतरादरम्यान हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे बोर्डाने त्यासाठी मंजुरीही दिली आहे.
टीसीएएस ही स्वदेशी डिझाइन केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणाली आहे. आणि भारतीय उत्पादकांच्या सहकार्याने भारतीय रेल्वेने ती प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीने सिग्नलच्या नादुरूस्तीमुळे होणारे अपघात तसेच रेल्वेच्या वेगाने होणारेही अपघात टाळता येणार आहेत. तसेच रेल्वेचालकाच्या निष्काळजीपणाने होणारेही टाळता येणार आहेत.
टीसीएएस डिझेल लोकोसह उमरी आणि शिवणगाव स्टेशन दरम्यान लोको या ठिकाणी चाचण्या यशस्वीरित्या घेण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली.
यावेळी दक्षिण मध्य विभागाचे सरव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी, सुरक्षिततेला रेल्वे सातत्याने प्राधान्य देत आली असुन या यंत्रणेव्दारेही त्यातील अचूकता साधली जाणार आहे. अभियंत्यांच्या परिश्रमामुळेच ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याबद्दल माल्यांनी त्यांचे कौतुक केले...
0 टिप्पण्या