💥राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उद्या गुरुवारी परभणी दौरा💥
परभणी (दि.२८ आक्टोंबर) - राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे उद्या गुरुवार दि.२९ आक्टोंबर रोजी परभणी जिल्हा दौर्यावर येत आहेत.
राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे गुरुवारी सायंकाळी ०४-१५ वाजेच्या सुमारास नांदेड येथून परभणीतील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ०५-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेणार आहेत. त्यानंतर ०६-३० वाजेच्या सुमारास ते वाहनाने औरंगाबादकडे रवाना होणार आहेत..
💥राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा विद्यमान बांधकाम मंत्री अशोक चव्हाण शुक्रवारी परभणीत💥
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण शुक्रवार दि.३० आक्टोंबर २०२० रोजी परभणी जिल्हा दौर्यात येत आहेत.
मंत्री अशोक चव्हाण हे दुपारी १२-०० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ०१-३० वाजता सुरेश नागरे यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत. त्यानंतर दुपारी ०२-३० वाजेच्या सुमारास व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकार्यांच्या बैठकीस ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास मोटारीने नांदेडकडे प्रयाण करणार आहेत...
0 टिप्पण्या