💥महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खळ्ळखट्याट आंदोलनाचा इशारा💥
परभणी (दि.०३ नोव्हेंबर) - तालुक्यातील कानखेड शिवारात असलेल्या बळीराजा साखर कारखाना लि.कडून शेअर्सच्या नावाखाली शेतकर्यांची आर्थिक फसवणूक व लूट होत असून ती त्वरीत थांबवावी. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मनसेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
बळीराजा साखर कारखान्याकडून शेतकर्यांना वेठीस धरून त्यांना जबरदस्ती 25000/- रूपयांचे शेअर्स घेण्यास भाग पाडत आहे. आधीच ओल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल असून शेतकर्यांचा ऊस नेण्यासाठी आधी पंचवीस हजारांचे शेअर्स घेण्यास सांगितले जात आहे. जे शेतकरी शेअर्स घेणार नाहीत त्यांचा ऊस शेवटी नेण्यात येणार आहे.
तसेच शेअर्स न घेणार्या शेतकर्याची पुढील वर्षासाठी नोंदही घेतल जाणार नसल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे. शेअर्सशी कारखान्याचा काहीही संबंध नसून हा कारखाना साजगी असल्याने यांना कोणतेही शासकीय नियम लागू नसल्याचे शेतकर्यांना सांगत आहेत. त्यामुळे शेतकर्यांडून शेअर्सच्या नावाखाली घेतलेले पैसे परत करायला भाग पाडून शेतकर्यांची होणारी ही लूट थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी परभणी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर रूपेश देशमुख (सोनटक्के) जिल्हाध्यक्ष, श्रीनिवास लाहोटी (जिल्हा संघटक), अनिल बुचाले (तालुकाध्यक्ष पूर्णा), अर्जुन टाक (मनविसे जिल्हाध्यक्ष), तेजस संघई आदींच्या स्वाक्षर्या आहेत...
0 टिप्पण्या