💥भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत कदम यांच्या नेतृत्वाखाली आज महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते💥
पुर्णा (दि.१६ नोव्हेंबर) शहरातील जुना मोंढा येथील श्रीराम मंदिर येथे आज सोमवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य शासनाने राज्यातील मंदिर खुली केल्या संदर्भात महाआरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपाच्या वतीने मागील दोन महिन्यापासुन संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू होते त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. मागच्या दोन महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून सरकारला मंदिर उघडण्यास भाग पाडले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हासरचिटणीस लक्ष्मीकांत कदम,शहराध्यक्ष प्रशांत कापसे, स्वच्छ भारत मिशन जिल्हा समन्वयक विजय कराड,ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अजय ठाकूर ,भारतीय जनता युवा मोर्चा शहराअध्यक्ष विश्वनाथ होळकर ,विलासराव कदम ,बालाजी कदम,वैभव भायेकर,रमण ओझा,संजय अंभोरे,मुंजा कदम, भागवत कदम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
0 टिप्पण्या