💥व्हेटरनरी डॉक्टरची तात्काळ नियुक्ती करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अरूण पवार यांनी दिला💥
परभणी (दि.२८ नोव्हेंबर) महानगर पालिकेच्या पशु वैद्यकीय रुग्णालया मागील दोन वर्षापासून व्हेटरनरी डॉक्टर नसल्यामुळे पशु पालक तसेच शेतकऱ्यांना आपल्या आजारी पशुंचा उपचार करण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मनपा आयुक्तांनी आपले अधिकार वापरून तात्काळ व्हेटरनरी डॉक्टर पशु वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करून परभणी शहरातील मुक्या जनावरांचे होणारे हाल थांबवावेत अश्यया मागणीचे निवेदन प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे व्यवस्थापकीय सदस्य अरूण पवार यांनी महानगर पालिका आयुक्तांना दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी असे नमुद केले आहे की पशु वैद्यकीय अधिकारी नसल्याने आजारी पशुंचे प्रचंड हाल होत असतांना ही आपणास काही कसे वाटत नाही ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला असून निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून लम्पिस्किन ह्या आजाराने थयमान घातले आहे, त्या वेळी आम्ही आपली भेट घेऊन आपणास व्हेटरनरी डॉक्टर अधिकारी यांची नेमणूक करावी तेव्हा आपण होकार दिला मात्र अद्याप आपण व्हेटरनरी डॉक्टर वैद्यकीय अधीकारी यांची नेमणूक केली नाही आता केंद्र सरकारच्या वतीने लाळ्या खुरकद रोग समूल्य उच्याटन साठी लसीकरण करायचे आहे .
जनावरांना लाळ्या खुरकूत या आजाराचची प्रतिबंधक लस देण्याची विशेष मोहीम १ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. देशभरातून हा आजार १००% हटविण्यासाठी एकही जनावर या लसीकरण सुटू नये म्हणून जनावरांना टॅग (कानाला बिल्ला मारणे) करण्यात येत आहे आपण लम्पिस्किन साठी कुठल्याच प्रकारची उपाय योजना शहरातील जनावरांसाठी अद्याप पर्यंत केलेली नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे तरीही तात्काळ लाळ्या खुरकूत या आजाराचे लसीकरण करावे अन्यथा आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना आपल्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करावी लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असेही श्री.पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे...
0 टिप्पण्या