💥नानलपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील इतकापूरा मोहल्ल्यात अवैध मटका बुक्कीवर धाड 20,320/- रुपयांचा मुद्देमाल जप्त💥
परभणी (दि.१९ नोव्हेंबर) जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात बोकाळलेल्या अवैध धंद्यांचा विमोड करण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी विशेष पथकाची स्थापना केली असून सहा.पो.उप.नि.चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने आज गूरूवार दि.१९ नोव्हेंबर रोजी शहरातील नानलपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील इतकापूरा मोहल्ला परिसरात धाड टाकून आरोपी शेख शाहिद शेख़ साहेब,अनिल खटिंग,अखिल मणियार या तिन आरोपींसह एकून २०,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी सहा.पो.उप.नि.पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकात यशवंत वाघमारे,शंकर गायकवाड़ ,हाके आदींची प्रमुख उपस्थिती होती...
0 टिप्पण्या