💥विशेष पथकाने २ ठिकाणी केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल १ लाख ६२ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त ६ आरोपी ताब्यात💥
परभणी (दि.२८ नोव्हेंबर) जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे साम्राज्य उध्वस्त करून संपूर्ण जिल्हा अवैध धंद्यांसह गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी स्थापण केलेल्या विशेष पथकाने एकामागून धाडसत्राला सुरूवात केल्याचे दिसत असून अत्यंत कार्यक्षम व कर्तव्यदक्ष म्हणून परिचित असलेल्या पिएसआय.चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील दैठना पोलिस स्थानकाच्या हद्दीतील आमडापुर शिवरात दोन अवैध दारु विक्रेत्यांवर धाड टाकून एकून १ लाख ५१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी ताब्यात घेतले तर जिल्ह्यातील पाथरी शहरातील अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यावर विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत ६९३ अवैध देशी दारु बॉटलसह १३९ बॉटल विदेशी दारु व ४० लिटर हातभट्टी दारू असा एकंदर ६२ हजार ३७४ रुपयांच्या दारूसह ४ आरोपी ताब्यात घेत पथकाने टाकलेल्या दोन्ही ठिकाणच्या धाडीत तब्बल १६२८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विशेष पथकाने केलेल्या धाडसी कारवाई वेळी पिएसआय चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकात पोलीस कर्मचारि सुग्रीव केंद्रे,नीलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,विष्णु भिसे,दिपक मुदिराज,अजहर पटेल आदी कर्मचारी उपस्थित होते...
0 टिप्पण्या