💥विशेष पथकाच्या धाडीत ३,४८,५२०/-रूपयांच्या मुद्देमालासह हाय प्रोफाईल जुगारडे ही पथकाच्या ताब्यात💥
परभणी (दि.२० नोव्हेंबर) - सिमेमागृहातील पडद्यावर एका कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्याची भुमिका साकारणाऱ्या आणि सिंघम बनून गुन्हेगारी प्रवृत्तीचा विमोड करणाऱ्या अजय देवगणच्या कौतुकास्पद कामगिरीवर अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट करून संपूर्ण सिनेमागृह डोक्यावर घेणाऱ्या परभणी जिल्ह्यातील नागरीकांनो आता प्रत्यक्ष जिवनात आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून जनसामान्यांशी बांधिलकी जोपासत गुन्हेगारी प्रवृत्ती अवैध व्यवसायीक तसेच तस्कर माफियांसह गुन्हेगारी प्रवृत्तीला शरण देणाऱ्या खादीतील व्हाईट कॉलर खच्चरांविरोधात सिंघम बनून कायदा काय असतो हे दाखवून देणारा 'अस्सल सिंघम' रुपी कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.जयंत मिना यांच्या रुपात जिल्ह्याला लाभल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींसह तस्कर माफिया आणि खादीतील व्हाईट कॉलर खच्चरांनी वेळीच सुधारलेले बरे नसता भविष्यात त्यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ नयें असे प्रांजळमत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत असून कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींसह अवैध व्यवसायीकांच्या वाढत्या साम्राज्यांचा विमोड करण्यासाठी स्थापन केलेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने अवैध व्यवसाईक तसेच तस्कर माफियांसह गुन्हेगारी प्रवृत्तीं विरोधात जणुकाही यल्गारच पुकारल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील अवैध व्यवसाईक तस्कर माफियांना अक्षरशः पळता भुई कमी पडत आहे.
परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाने अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दि.२० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२-१० वाजेच्या सुमारास शहरातील शिवराम नगर परिसरातील गोविंद काकडे यांच्या घरात चालणाऱ्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड टाकून झन्नामन्ना जुगार खेळणाऱ्या आरोपी शेख हबीब शेख मासुम,मतीन खान मकसूद खान,युसूफ खान शब्बीर खान पठाण,किशोर श्रीकिशन तोष्णीवाल,सिध्दार्थ हरिभाऊ खाडे,सय्यद हनीफ सय्यद अहमद,गोविंद एकनाथ काकडे या ७ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून जुगार साहित्यासह तब्बल ३,४८,५२०/-रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून सातही आरोपीं विरोधात पोना.राहुल दत्तात्रय चिंचणी यांच्या फिर्यादी वरुन मुजुका कलम ४,५,१२(अ) प्रमाणे नवा मोंढा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील धाडसी कारवाई सपोउपनि.चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील पो.ना.यशवंत वाघमारे,पोना.राहुल चिंचाने,पोना शंकर गायकवाड़,पोना.अजहर,पो.शि.दिपक मुदिराज,पो.शि.जब्बार या विशेष पथकाने केली आहे...
0 टिप्पण्या