💥प्रतिबंधीत अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ॲटोसह चौदा पोते गुटखा साठा व आरोपीही घेतला ताब्यात💥
पूर्णा (दि.७ नोव्हेंबर) - नांदेड येथून पुर्णा शहरातील विजय नगर परिसरात एका पियाजो ॲटोतून प्रतिबंधीत विषारी अवैध गुटखा साठा येत असल्याची माहिती पुर्णा पोलिसांना मिळताच सपोनि.प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ यशस्वीपणे शोधमोहीम राबवून आज शनिवार दि.७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३-०० ते ०३-३० वाजेच्या सुमारास कानखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना परिसरात हिरव्या रंगाचा पियाजो ॲटो ज्याचा क्र.एम.एच.२६ एडी -९९३२ सह त्यातील १४ पोते किंमत १,८९२८०/- रुपयांचा गुटखासाठा व ३ आरोपी नामे शेख समत शेख जिलानी रा.गाडेगाव रोड देगलूर नाका नांदेड,अजमत खान पठाण रा.पुर्णा,मतीन बेग रा.समीराबाद नांदेड यांना ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई केली असून सपोनि.धुमाळ यांच्या फिर्यादी वरून तिन्ही आरोपी विरोधात गुरनं.३३१/२०२० कलम २७१,२७२,२७३३२८,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून.यावेळी सपोनि.प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.उप.नि.मार्कवाड,पो.उप.नि.गुट्टे,पो.कॉ.चन्नावार,पो.कॉ.समीर पठाण,पो.कॉ.पठाण आदींची उपस्थिती होती...
0 टिप्पण्या