💥पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बलात्कारी नराधमा विरोधात नवा मोंढा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल💥
परभणी (दि.३१ डिसेंबर) - शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात एका नराधमाने चारचाकी वाहनात ओढत एका महिलेवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना काल बुधवार दि.३० डिसेंबर २०२० रोजी घडली असून या घडलेल्या खळबळजनक घटने मुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या भयंकर घटने प्रकरणी पिडीत महिलेने नवामोंढा पोलिस स्थानकात काल बुधवारी रात्री उशीरा दिलेल्या तक्रारीवरून बलात्कारी नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने संदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार वृत्त असे की शहरातील वसमत रस्त्यावरील औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरातून सदरील महिला बुधवारी दुपारी जात असताना एका चारचाकी वाहनातील व्यक्तीने जबरदस्तीने वाहनात ओढून घेतले. त्यावेळी ओरड केली. विरोध केला. परंतु त्या वाहनाच्या चालकाने चाकू दाखवला. धमकावले. तसेच वाहनातील अन्य व्यक्तीने जबरदस्तीने बलात्कार केला, असे २६ वर्षीय पिडीत महिलेने नवामोंढा पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला फौजदार भावसार या करीत आहेत.
दरम्यान, या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली...
0 टिप्पण्या