💥इयत्ता १० वी व १२ वीच्या वर्गांना प्रथमतः होणार सुरूवात,तब्बल सहा महिण्यानंतर वाजणार शाळांची घंटा💥
परभणी (दि.१ डिसेंबर) - महानगरपालिका क्षेत्र म्हणजेच परभणी शहर वगळून परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांतील १० वी व १२ वीचे वर्ग उद्या बुधवार दि.२ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहेत.दरम्यान, शाळांचे वर्ग सुरू होण्याबाबत प्रशासकीय पातळीवरील सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहूळ यांनी दिली आहे.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार उद्या बुधवार पासून जिल्ह्यातील सर्वच शाळांतील दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तत्पुर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करून घेण्यात आलेले असून शाळांना हँडवॉश मशिन,थर्मलगन, ऑक्सीमीटर आदी साहित्य उपलब्ध करून घेण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. या शिवाय कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्रही शाळांनी घेतले आहेत. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर बुधवारी शाळांना प्रारंभ होणार आहे. पालकांनीही कोविड - १९ च्या खबरदारीच्या उपायांचे पालन करण्याबाबत पाल्यास (विद्यार्थ्यास) सांगावे, मास्क वापरण्यासह सोशल डिस्टंसिंगबाबतही अवगत करावे, असेही आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली आहे. अनेक शिक्षकांचे अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त झालेले आहेत, असेही डॉ. वाहूळ यांनी म्हटले...
0 टिप्पण्या