💥जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ५८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत💥
परभणी (दि.२९ डिसेंबर)'- परभणी शहरासह जिल्ह्यात आज मंगळवार दि.२९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत एकूण ८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या १६ कोरोनामुक्त व्यक्तींना आज सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ५८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार १७८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. तसेच आतापर्यंत ३०३ कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू पावल्या आहेत. तसेच १०२ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार २०९ नमुने घेण्यात आले. त्यात ७४ हजार २२६ चाचण्याचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच ७ हजार ३८४ चाचण्याचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. ४९८ चाचण्यांचे अहवाल अनिर्णायक आले असून ९९ अहवाल नाकारले गेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली...
0 टिप्पण्या