💥तरुण शेतकरी संतोष पारवे यांनी शिक्षणाचा उपयोग शेतीत करुन आधुनिक प्रयोग करत केली भेंडीची लागवड💥
पूर्णा (दि.२८ डिसेंबर) तालुक्यातील गौर येथील अत्यंत कष्टाळू व तरुण तडफदार शेतकरी संतोष गंगाधर पारवे यांनी अवघ्या १५ गुंठे शेतीत स्वतःच्या मेहनतीच्या बळावर भेंडीचे तब्बल १ लाख रुपयांचे उत्पन्न काढून आश्चर्याचा धक्का दिला आहे.
तालुक्यातील गौर येथील संतोष गंगाधर पारवे यांनी खरीप हंगामामध्ये कापसाची मे महीन्यात थिबक सिंचनाचा वापर करून एक बॅग लागवड केली होती.एका कापसाच्या झाडाला १०० ते १३० बोंड लागली होती मात्र अतिवृष्टीमुळे व सातत्याने ४५ दिवस ढगफुटी झाल्याने पूर्ण कापूस आडवा पडला व बोंडे सडुन नासुन गेली खर्च करूनही उत्पादन काहीही झाले नाही यावर ही खचुन न जाता संतोष पारवे यांनी पुन्हा नव्या उमेदीने परत मशागत करुन भेंडी लागवड करुन १५ गुंठ्यात एक लाख रुपयाचे उत्पादन काढले.त्यासाठी दहा दिवसाला एक वेळेस फवारणी,आठवड्यातुन बुधवार, शुक्रवार, रविवार असे तीन दिवस भेंडी तोडणी करत होते . लॉकडावुनमध्ये वाहनाची व्यवस्था नसल्याने त्यांनी दुचाकीला लोखंडी पट्टिचा कल्पकतेने वापर करुन ९ कॅरेट नांदेडला विक्रीसाठी नेत होते . एक कॅऱेट ५०० रुपये किंमतील विक्री होत होते . हे सर्व करण्यासाठी मला माझ्या पत्नीने खुप मदत केली .मला प्रोत्साहन मार्गदर्शन फीनिक्सचे श्रीधर राऊत यांनी लागवड ते फवारणी करण्यापर्यंत केले .
**********************************************
💥गौर येथील तरूण तडफदारा शेतकरी संतोष गंगाधर पारवे यांनी दिलेली प्रतिक्रिया...!
कापूस लागवड करून उत्पादन तर झाले नाही खर्चही निघाला नाही परंतु खचुन न जाता मातीवर प्रेम करावे विस्वास ठेवावा उमेदीने कामाला लागले की काळी माती कष्टाला फळ देते म्हणून शिक्षणाचा उपयोग मी शेतीत करुन आधुनिक प्रयोग नेहमी करत राहणार अशी प्रतिक्रिया दिली .
0 टिप्पण्या