💥आत्महत्येच्या प्रयत्नातील इसम वन विभागात कर्मचारी आहे; प्राण वाचवणारे दोन युवकांनी पिंपळगाव येथील आहेत💥
पुर्णा (दि.८ जानेवारी) - शहरापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावरील सारंगी येथील पुलावरून मानसिक नैराश्यात असलेल्या एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला,परंतु याच दरम्यान पिंपळगावचे काळेश्वर भाटेगावकर व माणिक सोनटक्के यांना सदर कर्मचारी गोदावरीच्या अथांग पाण्यात बुडताना दिसला,त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ह्या वन विभागातल्या कर्मचाऱ्याला सुखरूप बाहेर काढलं...
तसेच त्याच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पूर्णेच्या सरकारी दवाखान्यात देखील भरती करून एक जिव मोठ्या धैर्याने वाचवलाय...सदर तरुणांचे पंचक्रोशीत कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय...
0 टिप्पण्या