💥शिवसेना नगरसेवक शामराव कदम यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा💥
पुर्णा शहरातील राजकीय क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाचा शिक्का मोरतब करीत आपल्या सामाजिक कार्याला स्वस्तिक मित्र मंडळाच्या माध्यमातुन सुरूवात करत शिवसेना शहर प्रमुख पदाचा पदभार तब्बल दहा वर्षे यशस्वीपणे पार पाडीत पुर्णा नगर परिषदेत प्रथमतः मा.नगराध्यक्षा श्रीमती लक्ष्मीबाई लक्ष्मणराव कदम यांच्या रुपाने प्रथमच शिवसेनेला नगराध्यक्षपद प्राप्त करून देत नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकण्याचे श्रेय शिवसेनेचे शामराव कदम यांनाच जाते यानंतर सन २०१५ साली झालेल्या पुर्णा नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणूकी वेळी सुध्दा प्रचार प्रमुख पदाची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडीत जनमतातून झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ही नगराध्यक्ष पदावर श्रीमती गंगाबाई सितारामआप्पा एकलारे या बहुमताने निवडून आल्या प्रचार प्रमुख या नात्याने विजयाचे श्रेय सुध्दा जाते.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सातत्याने पुढाकार घेणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून प्रत्येक समाजातील संत महापुरूषां विषयी आदराची भावना जोपासनाऱ्या शामराव कदम यांनी सन २०१७ यावर्षी शहरात उसळलेल्या दंगली नंतर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,संत नरहरी महाराज चौक,छत्रपती संभाजी महाराज चौक या परिसरातील संत महापुरूषांच्या नाम फलकांच्या झालेल्या मोडतोडी नंतर त्या संत महापुरूषांच्या भव्य फलकांची स्वखर्चातून निर्माती करून या नाम फलकांचे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी सन्मानपुर्वक अनावरण करण्याचे अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद कार्य केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मा.बसवेश्वर चौक येथिल बेशिस्त हातगाडेवाले यांना योग्य शिस्त लावण्याकरीता तत्कालिन पोलिस अधिक्षक मनोज पाटील आणी कृष्णकांत ऊपाध्याय यांच्याकडे वेळोवेळी मागणी करीत या मागणीचा पाठपुरावा करून या महापुरूषांच्या नियोजित पुतळा परिसर खुला करण्याचे धाडसी काम करणारा शिवसेना नेता म्हणून शामराव कदम यांच्याकडे बघितले जाते.
शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतांना पक्षाच्या प्रत्येक अंदोलनात ते सक्रिय सहभाग नोंदवत असतात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सत्कार खेळाडूंना प्रोत्साहन देणे,धार्मिक सामाजिक कार्यात पुढाकार घेणे,रक्तदान शिबिरांना सहकार्यासह रक्तदान शिबिरात वेळोवेळी स्वतः रक्तदान करून युवकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहीत करणे अश्या या जनहीतवादी शिवसेना नेत्याचा आज अभिष्ठचिंतन सोहळा असून शामराव कदम यांना आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो अशी आई तुळजा भवानी चरणी मनपुर्वक प्रार्थना व शिवसेना नेते नगरसेवक शामराव कदम यांना वाढदिवसाच्या मनपुर्वक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा....
0 टिप्पण्या