💥दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे अभिवादन व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी देव्हडे बोलत होते💥
✍️ मोहन चौकेकर
चिखली (दि.९ जानेवारी) : लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी आपल्या क्षेत्रात एक वेगळीच चमक दाखवून पत्रकारिता उज्ज्वल करावी असे प्रतिपादन भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक रामदासभाऊ देव्हडे यांनी केले.
चिखली तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे अभिवादन व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर चिखली तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष कैलास गाडेकर व चिखली तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष इफ्तेखार खान, सचिव योगेश शर्मा, कोषाध्यक्ष रवींद्र फोलाने यांची उपस्थिती होती.
पूढे बोलतांना रामदासभाऊ देव्हडे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करीत मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही ज्याप्रमाणे आमचे क्षेत्र हे नगर पालीकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे हे ठरविले आहे. त्याप्रमाणे आपण निवडलेले पत्रकारिता क्षेत्र हे एक जनसेवेचेच कार्य आहे. या माध्यमातून पत्रकार बांधवांनी आपले कार्य करावे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणरुपी लावलेल्या रोपट्याचे आता मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. असे मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार संघाच्यावतीने जाहीर झालेला जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रक़ार अॅड.गिरीश दुबे यांना देण्यात आला. पण शरीरस्वास्थामुळे ते येवू शकले नसल्याने त्यांच्यावतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदासभाऊ देव्हडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आपल्या प्रास्ताविकात नवनिर्वाचित अध्यक्ष इफ्तेखार खान यांनी पत्रकार संघाने आतापर्यंत राबविलेल्या विविध सामाजिक कार्य, तर भविष्यात राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. तर आभार प्रदर्शन मावळते अध्यक्ष कैलास गाडेकर यांनी केले. कार्यक्रमचे बहारदार सुत्रसंचालन कमलाकर खेडेकर यांनी केले. यावेळी नगरसेवक गोविंद देव्हडे यांच्यासह विजय गोंधणे, कैलास शर्मा, गणेश सोळंकी, रमाकांत कपूर, नितीन फुलझाडे, भिकु लोळगे, इम्रान, रमीस राजा, मोहन चौकेकर, विजयकांत गवई, सलीमभाई, शेख मुक्तार, राजेश बिडवे यांची उपस्थिती होती....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या