💥तालुक्यातील अठ्ठावन गावातील ८३ हजार मतदार बजावणार आपल्या मतदानाचा हक्क💥
परभणी (दि.१५ जानेवारी) - जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ५८ गावात उद्या शुक्रवार दि.१५ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या शुक्रवारी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत तालुक्यातील अठ्ठावन गावातील एकून ८३ हजार मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार असल्याने तालुका प्रशासनासह पोलिस प्रशासनही सतर्क झाले असून पोलिस प्रशासनाने सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
पूर्णा तालुक्यात ६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिसूचना आयोगाने डिसेंबर महिन्यात घोषित केली त्यानुसार २३ डिसेंबर पासून प्रत्यक्ष प्रक्रियेस सुरुवात झाली सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर तालुक्यातील रुंज बरबडी भाटेगाव धोतरा ईठ्ठलापूर सुखी हटकरवाडी या ७ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आले आता तालुक्यात ग्रामपंचायत मध्ये उद्या रणसंग्राम होणार आहे त्यासाठी प्रशासनाच्यावतीने १९६ मतदान केंद्रावर ९६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे पूर्णा चुडावा ताडकळस पोलिसासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या होमगार्ड मतदान प्रक्रिया साठी अधिकारी फिरते पथक कार्यान्वित करण्यात आले आहे आज दि.१४ जानेवारी २०२१ रोजी या मतदान केंद्रांवर एसटी महामंडळाच्या वतीने मतदान पेट्या कर्मचारी रवाना करण्यात आले आहे चुडावा परिसरात २० पूर्णा परिसरात २५ ताडकळस परिसरात २० गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यात बारा मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी बाळगा प्रशासनाने उपायोजना केलेली आहे.
मागील पंधरा दिवसाच्या धडाकेबाज प्रचारा नंतर उद्या दि.१५ जानेवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे या मतदान प्रक्रियेत तालुक्यातील तब्बल ८३ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणुकीवर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार पल्लवी टेमकर वंदना मस्के दशरथ कोकाटे उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड आदीं बारकाईने लक्ष ठेवून आहे....
0 टिप्पण्या