💥राज्य सरकारने डिस्कनेक्शन मोहिम थांबविली; लाखो शेतकर्यांचा वीज पुरवठा सुरळीत💥
✍️तुषार उपाध्याय..✍️
गंगाखेड (दि.४ मार्च) - राज्यातील शेतकर्यांच्या वीज बिलांसाठी महावितरणकडून सुरु करण्यात आलेल्या डिस्कनेक्शन मोहिमेच्या विरोधात गंगाखेडचे आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डाँ. रत्नाकर गुट्टे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. विधानसभेत आवाज उठवून रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला हेाता. काल विधानसभेच्या प्रवेशद्वारावर आमदार डा. गुट्टे यांच्या पुढाकारातून विरोधीपक्षातील आमदारांनी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकार या बाबत नरमले असून शेतकर्याचा वीज पुरवठा यापुढं खंडीत केला जाणार नसल्याची घोषणा केली.
💥आमदार गुट्टे यांच्या पुढाकारातूनच राज्यातील लाखो शेतकर्यांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे💥
गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लाकडाउऊनमुळे त्याच बरोबर अतिवृष्टी, बोगस बियाणे अशा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकर्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. राज्य सरकारकडून या शेतकर्यांच्या वीज बिलाबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आले होते. मात्र लाकडाउऊन संपताच महावितरणकडून डिस्कनेक्शन मोहिम राबविण्याला सुरुवात झाली होती. सध्या शेतकर्यांच्या शेतात उभ्या असलेल्या उस, केळी, हरभरा, गव्हू, ज्वारी या पिकांना पाणी देण्याची वेळ असतांनाच शेतकर्याचा वीज पुरवठा महावितरणकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता खंडीत करण्याची मोहिम सुरु झाली हेाती. अचानकपणे वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार होते.
या बाबत आमदार गुट्टे यांनी कर्जमाफीप्रमाणे शेतकर्यांची वीजबिल माफी करावी अशी जोरदार मागणी केली होती. हे शक्य नसेल तर शेतकर्यांना बील भरण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी, ज्या शेतकर्यांचं दहा हजार रुपयापेक्षा जास्त बिल असेल त्या शेतकर्यांना बिलाचे हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी करत या प्रश्नी राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता त्याच बरोबर विधानसभेतही प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. काल विधानसभेच्या प्रवेशद्वारावर आमदार गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची आणि आमदार गुट्टे यांच्या भूमिकेची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नसल्याचे विधानसभेत सांगितले.आमदार गुट्टे यांनी शेकतर्यांच्या प्रश्नावर घेतलेला पुढाकार आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले असून राजयतल्या लाखो शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे....
0 टिप्पण्या