💥परभणी जिल्ह्यातील सेलु शहरातील रायग कॉर्डनर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई....!


💥काळ्याबाजारात जाणारा शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील ८० क्विंटल तांदूळ स्थागुशाच्या पथकाने केला जप्त💥 

परभणी (दि.१९ मार्च) - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील सेलु शहरातल्या रायगड कॉर्नर परिसरात अत्यंत धाडसी कारवाई करीत काल गुरूवार दि.१८ मार्च २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील शासकीय राशनचा ८० क्विंटल तांदूळाचा साठा जप्त केला.

परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचार्‍यांना शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतील शासकीय राशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी एका आयशर ट्रकमधून नेला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड कर्मचारी बालासाहेब तुपसमिद्रे,शेख मोबीन,श्री.निळे,रामेश्वर मुंडे आदींनी मारोतीनगर येथून एक ट्रक निघाल्याचे समजताच पथकाने तो ट्रक एमएच ०४ डीडी ३१९५ सेलू शहरातील रायगड कॉर्नर येथे थांबवला. चालकाची चौकशी करत आतील साहित्याची तपासणी केली. त्यावेळी त्यात तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. तांदळाबाबत अधिक माहिती विचारली असता चालक उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने आतील मुद्देमालाबाबत संशय बळावला. राशनचा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय पथकास आला. ट्रकमध्ये ८० क्विंटल तांदळाच्या पोत्यासह रिकामे पोते, पोते शिलाई करण्याची मशीनही त्यात सापडली. पथकातील अधिकांर्‍यांनी तो ट्रक ताब्यात घेत सेलू पोलिसांच्या स्वाधीन केला. 


तत्पूर्वी ट्रकमधील साहित्याची मोजदाद केली असता त्यात १०७ कट्टे तांदूळ आढळून आला. ८० क्विंटल तांदूळ यावेळी पथकाने जप्त करीत सेलू पोलिसांच्या ताब्यात दिला. देवूळगाव गात येथील गोदामातून तांदूळ घेऊन तो मंठा येथे जात असल्याची माहिती संबंधित चालकाने पथकास दिल्याचे समजते.

दरम्यान, तांदूळ राशनचा आहे का याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक तहसील प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून तहसील प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या