💥जिल्ह्यात रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू💥
परभणी (दि.१६ मार्च) - परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीचा कहर थांबता थांबत नसून सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांत वाढ होत असल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.शहरासह जिल्ह्यात आज मंगळवार दि.१६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपर्यंत तब्बल ११६ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधित महिलेचा आज रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या २६ व्यक्तींना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ५४१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर जिल्ह्यात आजपर्यंत ३४६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ९ हजार ५३६ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ६४९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३४० व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३३ हजार २२४ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार ३८३ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....
0 टिप्पण्या