💥बँंक कर्मचाऱ्यांचा संपामुळे बँका दोन दिवस बंद राहणार....!


💥बँकेतील कामे करण्यासाठी या डिजिटल व अन्य पर्यायांनी बँकेची कामे करा💥   

✍️  मोहन चौकेकर

खासगीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी आज 15 मार्च सोमवार आणि 16 मार्च मंगळवार असा 2 दिवस देशव्यापी संपाची हाक दिली आहे.  रविवार देखील सुट्टी होती  त्यामुळे  लागोपाठ तीन दिवसांत सर्व लाखो  व्यापारांचे व लाखो नागरीकांचे सर्व आर्थिक व्यवहार  जवळपास ठप्प व विस्कळीत होणार आहे त्यामुळे बँका बंद असल्याने या काळात  सर्व व्यापाऱ्यांनी व सर्व नागरिकांनी  खाली सांगितलेल्या डिजिटल व अन्य पर्यांयांचा वापर करुन आपली सर्व आर्थिक कामे करुन घ्यावी.

 💥बँका बंद असल्यास या  डिजिटल व अन्य पर्यायांनी बँक व्यवहार करावा-

नेट बँकिंग - आज जवळपास सर्वच बँकांकडून ग्राहकांना नेट बँकिंग सुविधा दिली जाते. यामुळे ग्राहकाला घर बसल्या बँकिंग व्यवहार करता येणे शक्य आहे.

- डेबिट/क्रेडिट कार्ड - ई-कॉमर्स बाजारपेठेत डेबिट किंवा क्रेडिट कार्डने ऑनलाईन खरेदी, खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर करता येऊ शकतात. ज्याचे पेमेंट कार्डने किंवा ॲपने करता येईल.

एटीएम - बहुतांश एटीएम ही बँकिंग सेवेची केंद्र बनली आहेत. ज्यात तुम्हाला चेक जमा करणे, चेकबुक रिक्वेस्ट टाकणे, पैसे काढणे, जमा करणे तसेच हस्तांतर करणे यासारखी महत्वाची कामे करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे

 ई-वॉलेट्स-छोट्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी ई-वॉलेट्सचा मोठ्या संख्येने वापर केला जात आहे डिजिटल पेमेंट्सचा पर्याय-

 जर तुम्हाला वीज देयके किंवा इतर देणी चुकती करायची असल्यास तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा पर्याय स्वीकारू शकता. 

'एनईएफटी' (NEFT)/ 'आरटीजीएस' (RTGS)-* नॅशनल इलेक्ट्राॅनिक फंड ट्रान्सफर सेवेमुळे (एनईएफटी) देशभरात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करणे सुलभ व लवकर होते. 1 जानेवारीपासून 'एनईएफटी' निशुल्क झाले आहे. त्याचबरोबर ग्राहकाकडे ऑनलाईन बँकिंग सेवा असल्यास कुठूनही NEFT आणि RTGS चे व्यवहार करु शकतात. या दोन्ही सेवा 24 तास सुरु असतात. 

IMPS (आयएमपीएस)-* इमिजिएट पेमेंट सर्व्हिस अर्थात 'आयएमपीएस' ही 24 तास चालणारी ऑनलाईन सेवा आहे. यासाठी तुम्हाला बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेत नोंदणी करावी लागेल. 'आयएमपीएस'मधून तुम्ही 2 लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता...

✍️  मोहन  चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या