💥परभणी जिल्ह्यातील धार्मीकस्थळे राहणार १५ मार्चपर्यंत बंद....!


💥जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी💥

परभणी (दि.०५ मार्च) - परभणी जिल्ह्यात कोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धार्मीकस्थळे येत्या १५ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज शुक्रवार दि.०५ मार्च २०२१ रोजी दिले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता व सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मीक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता काही कालावधीकरिता बंद करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी दि. सात मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यात वाढ करत धार्मिक स्थळे आता १५ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवावित असे आदेश जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी आज शुक्रवारी सायंकाळी नव्याने जारी केले.

दरम्यान, धार्मीक स्थळांमध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यास पाच व्यक्तींना परवानगी राहील, असेही आदेशात म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या