💥आ सौ श्वेताताई महाले पाटिल यांच्या प्रयत्नाने बुलढाणा जिल्ह्याला मिळाले 85 ऑक्सिजन सिलेंडर....!


💥ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाल्याने रुग्णासोबतच डॉक्टरांनीसुद्धा सुटकेचा श्वास सोडला आहे💥

  ✍️  मोहन चौकेकर

चिखली ÷ कोरोनाच्या हाहाकारामुळे रेमडीसीवीर सोबतच रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन सिलेंडरला मागणी वाढल्याने प्रचंड तुटवडा जाणवत आहे . ऑक्सिजनसाठी रुग्ण तडफडत असून डॉक्टरलोक ही हतबल झाले आहे . काल चिखली येथे एकही ऑक्सिजन सिलेंडर नसल्याची गंभीर बाब आ सौ श्वेताताई महाले यांना माहीत पडल्याने त्यांनी तातडीने बीड आणि जालना येथील ऑक्सिजन प्लांटसोबत बोलून चिखली आणि बुलडाणा शहरातील खाजगी डॉक्टरांसाठी 85 ऑक्सिजन सिलेंडर मिळवुन दिल्याने किमान दोन दिवसांचा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाल्याने रुग्णासोबतच डॉक्टरांनीसुद्धा सुटकेचा श्वास सोडला आहे. मिळालेल्या 85 ऑक्सिजन सिलेंडरपैकी 45 सिलेंडर बुलढाणा येथे दि 18 एप्रिलच्या तर उर्वरित 40 सिलेंडरची खेप दि 19 एप्रिलच्या सकाळी चिखली येथे पोहचली आहे.

          चिखलीसाठी ऑक्सिजन सिलेंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही अशी माहिती प्रशासनाकडुन मिळाली . त्यामुळे आ सौ श्वेताताई महाले पाटिल या अतिशय अस्वस्थ झाल्या . त्यांनी बीड , जालना व राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन प्लांटचे नंबर घेऊन त्यांच्याशी बोलून चिखली शहरात एकही सिलेंडर नसल्याने अनेक रुग्णाचे जीव जातील व अनेकांचे हाल होतील ही विदारकता ऑक्सिजन प्लांटच्या व्यवस्थापना समोर मांडली . परंतु अनेक ऑक्सिजन प्लांटवाल्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांनी सिलेंडर देण्यास असमर्थता दर्शविली . परंतु बीड आणि जालना येथून ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे आश्वासन तेथील प्लांटने दिले . परंतु त्यासाठी त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या पत्राची मागणी केली . त्यामुळे आ सौ श्वेताताई महाले पाटिल यांनी चिखली ऑक्सिजन पुरवठा नोडल अधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार डॉ अजितकुमार येळे सदर बाब यांच्या निदर्शनास  आणून दिले 

संबंधित अधिकारी यांनी क्षणाचाही विलंब न लावता चिखली साठी पत्र देण्याची हमी दिली . सोबतच उपजिल्हाधिकारी भुषण अहिरे यांनी आ सौ श्वेताताई महाले यांच्याकडे बुलडाणा शहरातसुद्धा ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा असल्याचे सांगून बुलडाणा शहरासाठी सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्याची मागणी केली .  त्यांच्या मागणी प्रमाणे आ सौ श्वेताताई महाले यांनी बीड व जालना येथिल प्लांट व्यवस्थापना सोबत विनंती करून बुलडाणा शहरासाठी सुद्धा सिलेंडर देण्याची मागणी केली. त्यांनी त्यांच्या मागणीवरून सिलेंडर देण्याचे कबूल केले . उपजिल्हाधिकारी अहिरे व तहसीलदार चिखली यांनी तातडीने पत्र देऊन बीड व जालना येथे गाडी पाठवली . त्यामुळे ठरल्याप्रमाणे बुलडाणा येथे 45 तर चिखली येथे 40 ऑक्सिजन सिलेंडर प्राप्त झाले आहे . 

रुग्णाना तर आहेच पण व्यवस्थेत प्राण फुंकण्याची गरज .आ सौ श्वेताताई महाले पाटील राज्य शासनाच्या नाकर्ते पणामुळे राज्यातील नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सरकारचे अपयश समोर आणणाऱ्या विरोधी पक्षांलाच टार्गेट करून प्रत्येक गोष्टीकरिता केंद्राकडे बोट दाखवून आपला निष्क्रिय कारभार झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वतः ही करायचे नाही आणि इतरांनाही प्रयत्न करून परिस्थिती सुधारू द्यायची नाही . चुका दाखविल्यास त्यांनाच टार्गेट करायचे असा प्रकार सत्ताधारी करीत आहे. सत्ताधारी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी काय करतात हे सांगण्यापेक्षा विरोधी काय करत आहे हेच सांगण्यात त्यांचा वेळ जात आहे . आणि राज्यातील जनतेचा प्राण जात आहे. त्यामुळे सर्व व्यवस्था खिळखिळी झालेली असून रूग्णांना तर प्राणवायू हवाच सद्यस्थितीत असणाऱ्या व्यवस्थेतही प्राण फुंकण्याची गरज असल्याचा घणाघात आ सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी केली . सोबतच प्रशासनाचे सहकार्याने बुलडाणा जिल्ह्याला लागणारा ऑक्सिजन सातत्याने मिळवून देण्यासाठी यापुढेही प्रयत्न करतच राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले..

✍ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या