💥जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर पाटील वाघीकर यांच्या हस्ते करण्यात आला कोविड लसीकरणाचा शुभारंभ💥
बोरी/ वार्ताहर
जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ 9 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर पाटील वाघीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोरळकर प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे पंचायत समिती विस्तार अधिकारी नंदकिशोर अडते वैद्यकीय अधिकारी डॉ आनंत दहिवाल ग्राम विकास अधिकारी राजेश पारवे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी 45 ते 60 वयोगटातील शंभर वर नागरिकांना कोवीड लस देण्यात आली . यावेळी आरोग्य व ग्रामपंचायत च्या वतीने गावांमध्ये जनजागृती करून लस घेण्याचे आव्हान करण्यात आले या कार्यक्रमास सरपंच सचिन तोडकर,उपसरपंच संतोष बडवणे, शिवराज रोहीणकर,प्रदीप वाघीकर,साहेबराव साखरे, प्रशांत वाघीकर ,विश्वबंर बोबडे, वैजनाथ शेंगुळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते विशेष करून महिलांची मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी पुढाकार होता .
जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर वाघीकर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे अधिकारी डॉक्टर आनंत दहिवाल ग्रामसेवक राजेश पारवे सरपंच सचिन तोडकर उपसरपंच संतोष बडवणे नागरिक दिसत आहेत.
0 टिप्पण्या